Old bikes for sale near Municipal High School in Malegaon. esakal
नाशिक

Nashik News: जुन्या दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा! नव्या वाहनांच्या वाढत्या किमतीचा परिणाम; विक्रेत्यांसाठी ‘अच्छे दिन’

कमी किमतीत जुन्या दुचाकी मिळत असल्याने अनेकजण जुनी दुचाकी खरेदी करण्यास पसंती देवू लागले आहे.

जलील शेख

मालेगाव : नवीन दुचाकींच्या किमतीमध्ये कंपन्यांकडून भरघोस वाढ झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना नवीन दुचाकी घेणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे कमी किमतीत जुन्या दुचाकी मिळत असल्याने अनेकजण जुनी दुचाकी खरेदी करण्यास पसंती देवू लागले आहे.

त्यामुळे जुन्या दुचाकी खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना 'अच्छे दिन' आले आहे. नवीन दुचाकीमध्ये बीएस ६ या विना कॉर्बोरेटर असलेल्या या दुचाकींसंदर्भात नागरिकांमध्ये गैरसमज असल्याने त्याचा फटका बसत आहे. (Consumers tend to buy old bikes Effect of rising cost of new vehicles Good Day for Sellers Nashik News)

नवीन दुचाकीमध्ये बीएस ६ विना कार्बोरेटर असलेली वाहने कोरोनानंतर २०२० मध्ये बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या. या वाहनांना कार्बोरेटर नसल्याने अनेक जण बीएस ४ कार्बोरेटर असलेल्या गाडीला पसंती देत आहेत.

त्यामुळे जुन्या वाहनाच्या किमती दुपटीने वाढ झाली आहे. शहरात जुने वाहन विक्री करणाऱ्या सुमारे साडेतीनशे ऑटो कन्सल्ट आहेत. बीएस ६ या वाहनासंदर्भात गैरसमज असल्याने बीएस ४ व कार्बोरेटर असलेल्या गाड्यांना अच्छे दिन आले आहेत.

खासकरुन होन्डा, हिरो कंपनीच्या दुचाकीयासह मोपडला अधिकची मागणी आहे. ग्रामीण भागात बजाज कंपनीच्या वाहनांची क्रेझ जास्त आहे. २०१८ ते २०२० पर्यंत मिळणाऱ्या दुचाकींच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी महागल्या आहेत.

येथे मुंबई, नाशिक, मालेगाव यासह कसमादे परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. येथील म्युनिसिपल हायस्कूल, सुपर मार्केट, जुना आग्रा रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन, नयापुरा, कॅम्प, संगमेश्‍वर यासह विविध भागात ऑटोकन्स्टल्ट आहेत.

शहरात सर्व सामान्य नागरीक राहत असल्याने त्यांचा जुनी मोटारसायकल घेण्याकडे कल आहे. कार्बोरेटर असलेल्या दुचाकीत अगदी कमी पेट्रोल टाकले तरी वेळ निघते. त्यामुळे अनेक जणांचा जुन्या दुचाकी घेण्याकडे कल वाढला असल्याचे पारस ऑटो कन्सल्ट संचालक बब्बू शेख यांनी सांगितले.

‘बीएस ६’ बाबत गैरसमज

बीएस ६ ही वाहने संगणकीकृत आहेत. या वाहनांचे किरकोळ दुरुस्ती असली तरी ही कामे छोट्या मोठ्या कारागीरांकडे होत नाही. त्या कामासाठी त्यांना शोरुमला जावे लागते.

तसेच बीएस ६ मध्ये कार्बोरेटर नसून मोटार असल्याने त्यात किमान दोन ते अडीच लिटर पेट्रोल कायम ठेवावे लागते.

सर्वसामान्य नागरिक एवढे पेट्रोल दुचाकीत ठेवू शकत नाही. बीएस ६ या दुचाकीचे स्पेअरपार्ट महाग आहे. बीएस ६ संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT