Nashik Thermal Power Corporation esakal
नाशिक

नाशिक : कंत्राटदारांच्या खात्यात दीड कोटी जमा तरीही कामगार वंचित

बहुतांशी कामगारांच्या खात्यात पी व्ही चे पैसे जमा न झाल्याने कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहे.

नीलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील (Thermal power station) कंत्राटी (Contract Basis) कामगारांच्या वेतनवाढ फरक कंत्राटदारांच्या खात्यात 1 कोटी 68 लाख जमा झाला तरी काही अपवाद वगळता अजूनही बहुतांशी कामगारांच्या खात्यात पी व्ही चे पैसे जमा न झाल्याने कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहे. (Thermal Power contract basis workers nashik news)

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचा 'किमान वेतन-बोनस' (Minimum Wage Bonus) या विषयी दैनिक 'सकाळ'च्या वार्तांकनानंतर त्यांच्या हजेरीत मोठा फरक पडला व त्यानंतर 2020 पासूनचा वेतनवाढीचा मुद्दा ही लावून धरला आहे.

कंत्राटी कामगारांची पगार वाढ फरक व इतर भत्ते अशा विविध प्रकारच्या मागण्या व्यवस्थापनाला वेळ देऊनही तसेच कामगार उपायुक्त, नाशिक यांनी मध्यस्थी करूनही अद्यापही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) कामगार संघटनेने सर्वाना सोबत येऊन काम बंद ची हाक दिली आहे यापूर्वीच संघटनेने टूल डाऊन ची लेखी सूचना एकलहरे येथील व्यवस्थापनाला दिली आहे आता ऊर्जामंत्री यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे संघटनेने सांगितले.

स्थानिक वीज प्रशासनाने 31 मार्च पर्यंत किमान वेतन, वेतनावरील फरक , लागू भत्यांचा फरक व इतर फरक देण्याचे परिपत्रक काढले होते परंतु 31 मार्च उलटून गेला , कामगार उपायुक्त ची भेटीचा फार्स घातला गेला तरीही अद्यापही वेतन वाढीचा फरक कंत्राटी कामगारांना भेटलेला नाही.

"एकलहरे येथील कंत्राटदार हे नियमबाह्य काम करत असून व्यवस्थापन त्यावर काहीच कारवाई करत नाही उलट कंत्राटी कामगार यांना वेठीस धरले जाते." - श्री.हेमंत डगळे, सरचिटणीस, वंचित बहुजन आघाडी, एकलहरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT