PSI Convocation Ceremony esakal
नाशिक

Nashik PSI Convocation Ceremony : प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा उद्या दीक्षांत सोहळा

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील १२३ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा येत्या बुधवारी (ता. १७) होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील १२३ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा येत्या बुधवारी (ता. १७) होत आहे.

या तुकडीतील २४६ पुरुष व ५ महिला असे २५१ पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या पोलीस दलामध्ये समाविष्ठ होणार आहेत. (convocation ceremony of trainee police sub inspector tomorrow Nashik)

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कवायत मैदानावर दीक्षांत सोहळ्याला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार आहे. यावेळी सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक व राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची संचलन परेडनंतर पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

दरम्यान, अकादमीतील ही १२३ वी तुकडी असून खात्यांतर्गंत सरळ सेवेतून या प्रशिक्षण सत्रात २५१ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यामध्ये २४६ पुरुष व ५ महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आहेत.

तसेच, गेल्या ९ महिन्यात या प्रशिक्षणार्थींना भारतीय दंड संहिता, फौजदारी दंड संहिता, विशेष कायदे, सायबर क्राईम, फॉरेन्सीक सायन्स, गुन्हेगारी शास्त्र, कवायत, गोळीबार, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, योगा आदींचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यातील सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थींना विविध पुरस्कारांना यावेळी गौरविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

मुंबईकरांना लेप्टोचा धोका! पावसाच्या पाण्यात भिजलेल्यांनी ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घ्या, आयुक्तांचं आवाहन

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

SCROLL FOR NEXT