Traders buying coriander from farmer Yuvraj Jagtap of Tarukhedle.
Traders buying coriander from farmer Yuvraj Jagtap of Tarukhedle. esakal
नाशिक

Coriander Rates Hike: कोथिंबिरीला मिळाला सोन्याचा भाव! सहा एकरातून १२ लाख ५१ हजारांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

Coriander Rates Hike : तालुक्याच्या गोदाकाठ भागातील तारुखेडले येथील शेतकऱ्याच्या मेहनतीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. सहा एकरांमधील कोथिंबिरीला सोन्याचा भाव मिळाला.

नाशिक येथील व्यापाऱ्याने जागेवर १२ लाख ५१ हजार रुपयांमध्ये कोथिंबीर खरेदी केली आहे. (Coriander Rates Hike Income of 12 lakh 51 thousand from six acres to farmer of Tarukhedle nashik)

याबाबत माहिती अशी, की तारुखेडले (ता. निफाड) येथील शेतकरी युवराज एकनाथ जगताप हे गेल्या काही वर्षांपासून कोथिंबिरीचे पीक घेतात. मात्र, निसर्गाच्या विपरीत परिस्थितीचा नेहमीच या पिकाला फटका बसत आला आहे.

यंदाही पुन्हा एकदा त्यांनी आपल्या शेतात सहा एकर कोथिंबीर लावण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मेहनतीने ४५ दिवस कोथिंबिरीची काळजी घेत वाढविली आणि नशिबाने साथ दिली.

नाशिक येथील व्यापारी सुनील ढेंबरे यांनी तारुखेडले येथे जागेवर जाऊन युवराज जगताप यांची कोथिंबीर १२ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केल्याने कोथिंबिरीला सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, गेल्या आठवड्यातही येथील ज्ञानेश्वर शिंदे या शेतकऱ्याला पाच एकरांत १४ लाख रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी बदलत्या वातावरणामुळे कोसळलेला पाऊस आणि त्यामुळे सर्वच पिकांची झालेली वाताहत यामुळे भाजीपाला, कांदा, टोमॅटो यांचे अतोनात नुकसान झाले.

संपूर्ण पीक उद्‍ध्वस्त झाले. अशाही परिस्थितीत बळीराजा मोठ्या मेहनतीच्या जोरावर शेती करताना दिसत आहे. सध्या कोथिंबिरीला मिळणारा भाव निश्चितच दिलासादायक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

"कोथिंबिरीचे टोकिता कंपनीचे वाण लावले होते. ४५ दिवसांपूर्वी लावले व त्याची काळजी घेतली. पाणी व औषध यांचे योग्य नियोजन केले. आज चांगला भाव मिळाला. खूप आनंद होत आहे. यात परिवाराने खूप मेहनत घेतली." - युवराज जगताप, प्रगतिशील शेतकरी, तारुखेडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT