corn price 2450 Exporting to Malaysia Vietnam and Nepal high demand sakal
नाशिक

नाशिक : पिवळ्या सोन्याला इतिहासात सर्वोच्च मोल!

मक्याला २,४५० रुपयांचा दर; मलेशिया, व्हिएतनाम, नेपाळला निर्यात, देशांतर्गत मागणी सातत्याने वाढती

संतोष विंचू

येवला : रशिया-युक्रेन युद्धामुळे यंदा इतिहासात कधी नव्हे इतका दर मिळाल्याने मकाच्या भावाचा विक्रम झाला आहे. दोन हजाराच्या वर कधीही न गेलेला मका यंदा अडीच हजाराचा टप्पा पार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार रुपये पडले आहेत. दरम्यान नाशिकसह जिल्ह्यात यंदाही मक्याची विक्रमी पेरणी होण्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. व्हीएतनाम, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, कोलंबो येथे निर्यात होणारा मका राज्यातही भाव खात आहे. मुंबई, चेन्नई, कृष्णपटनमः पोर्टवरून सुमारे बारा ते सोळा लाख टन मका निर्यात झाला असून अजूनही मागणी वाढल्याने दर पंचवीसशे रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

नाशिक जिल्ह्यासह खानदेशातही पीक पॅटर्न सातत्याने बदलत असून बाजरी, डाळी व तेलबियाचे क्षेत्र निम्य्याने घटले आहे. मक्यासह कांदा, भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मका पीक घेण्यासाठी कमी भांडवल लागते. बियाण्याच्या किमती मर्यादित, फक्त दोन-तीन फवारण्या, अल्प खते, आंतर मशागतीसह काढणीसाठी अल्प खर्च, चाऱ्याला मागणी काढणी करताना पाऊस असला तरी बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते. यामुळे प्राधान्य दिले जात आहे.

अजूनही निर्यात सुरूच...

यावर्षी खरिपाच्या मकाचे पावसाने नुकसान केले तर रब्बीत अपेक्षित मका घेतला गेला नाही. त्यामुळे अजूनही बाजारातील मका व्हिएतनाम, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश येथे निर्यात होत आहे. याशिवाय गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यात मोठी मागणी आहे. सुरुवातीला कंपन्यांनी स्टॉककडे दुर्लक्ष केले. परिणामी मागणी व पुरवठा यात तफावत होऊन दरात तेजी आली आहे. मुंबई, कृष्णापटनम, विशाखापट्टणम, चेन्नई या बंदरावरून वर्षात १२ ते १६ लाख टन मका निर्यात झाल्याचे मुबई येथील निर्यातदार व सागर फ्रूटसचे संचालक सागर ठक्कर सांगतात.

पोल्ट्री व स्टार्चमुळे मागणी

पोल्ट्री व स्टार्च उद्योगात मक्याला वाढत्या मागणीमुळे २०१९-२० मध्ये खासगी बाजारात दर प्रति क्विंटलला दोन हजाराच्या आसपास पोहोचला होता. हंगामात दर १२०० ते १५०० च्या आसपास असतात तर १८७० रुपये दराने हमीभावाने मका खरेदी होतो. यावर्षी सुरुवातीला खासगी बाजारात १४०० ते १८५१ तर सरासरी १७६० दर मिळाला. त्यामुळे खासगी बाजारातच अधिक विक्री झाली आहे. निर्यातीत वाढ तसेच देशांतर्गत कमी उपलब्धतेमुळे मागणी वाढल्याने सातत्याने भाव वाढत आहे. येथील बाजार समितीत मकाला २४१८ हा सर्वोच्च भाव मिळाला आहे. इतिहासातील हा विक्रमी दर मानला जातो.

युक्रेन-रशिया युद्धामुळे देशातील मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरात तेजी असून यंदा २५०० रुपयांचा विक्रमी दर मिळत आहे. पोल्ट्री व स्टार्च उद्योग वाढल्याने मक्याला मागणी वाढली असून जिल्ह्यातील उत्पादन वाढत आहे. परवडणारा भाव, कमी उत्पादन खर्च आदी कारणांमुळेच शेतकरी मक्याकडे वळले आहेत. जिल्ह्यातील मका दरवर्षीच राज्यासह इतर देशात पाठवला जातो. शेतकऱ्यांसाठी हक्काचे नगदी पीक म्हणून मकाला पसंती मिळतेय.

- गोरख भागवत, मका व्यापारी, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : नाशिकमध्ये अतिवृष्टीचा कहर! २.६५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान, ४२५ कोटींची प्राथमिक भरपाई

Dock Pilot Recruitment : डॉक पायलट म्हणजे काय? 'ही' सरकारी कंपनी देणार १ लाख ६० हजार पगार; प्रशिक्षणासाठीही ४० हजार!

Latest Marathi News Live Update : नंदुरबारच्या आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, घातपाताची शक्यता

Indian Army Jawan : भारतीय सैन्य दलातील जवानाचा Heart Attack ने मृत्यू; साताऱ्यावर शोककळा, उद्या अंत्यसंस्कार

Sanjay Kaka Patil : संजय काका पाटील, अजित दादांची साथ सोडणार? संवाद मेळाव्यात संकेत

SCROLL FOR NEXT