corona fighter esakal
नाशिक

बेवारस रुग्णांचे अंत्यविधी करणारा ‘योद्धा’! शंभरवर मृतदेहांचे पॅकिंग

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : कोरोनाकाळात (corona virus) मृतदेहांच्या टाळूवरील लोणी खाणारे महाभाग समोर येत असताना ‘रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा’ मानून मदतीचा एक हात पुढे करत पालिकेचे सफाई कर्मचारी कदीर शेख यांनी हे सामाजिक काम केले आहे. (corona fighter kadir shaikh )

बेवारस रुग्णांचे अंत्यविधी करणारा ‘योद्धा’

कोरोना महामारीत (corona pandemic) कुटुंबाचे सदस्य पॉझिटिव्ह रुग्णांपासून दूर जात आहेत तेव्हा इतरांची काय बात. मात्र, अशा आपत्तीतही कोरोनामुळे मृत झालेल्यांचे (corona death bodies) मृतदेह पॅकिंग करण्याचे काम येथील पालिकेचा सफाई कर्मचारी कादीर शेख करत आहेत. एवढेच नव्हे, तर काही रुग्णांचे नातेवाईक नसल्यास अशा रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची सामाजिक जबाबदारीदेखील कादीर यांनी पार पाडली आहे. पालिकेचा सफाई कर्मचारी कादीर शेख यांनी कोरोनाने मृत झालेल्या शंभरपेक्षा जास्त मृतदेह प्लॅस्टिकमध्ये पॅक करून दिले आहेत.येथील उपजिल्हा रुग्णालयातील व खासगी दवाखान्यातील आतापर्यंत शंभरच्या वर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे शव प्लॅस्टिकमध्ये पॅक करून स्मशानभूमीत घेऊन जात आहेत.

रुग्णालयात शंभरवर मृतदेहांचे पॅकिंग

मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला किंवा कुणाचे नातेवाईक उपस्थित राहू न शकल्यास त्यांचे अंत्यविधीदेखील स्वतः करत आहेत. त्यामुळे कादीर शेख यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालिकेने माझी येथे नेमणूक केली असून, त्यांच्या सूचनेनुसार मी हे काम करत आहे. आतापर्यंत शंभरावर शव पॅकिंग केले. तर २५ ते ३० जणांचे नातेवाईक उपस्थित राहू न शकल्याने अशा मृतांचे अंत्यविधीदेखील पूर्ण केले आहे.

-कादीर शेख, सफाई कामगार, येवला

उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाल्यापासून कादीर शेख पॅकिंगचे काम करत आहे. नातेवाईकदेखील मृत रुग्णांकडे फिरकत नसताना कादीर निष्ठेने हे काम करत असून, अनेकांचे अंत्यविधी देखील त्यांनी पार पाडले आहेत.

- शैलेजा कुपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT