coronavirus recovery rate Google
नाशिक

जनजागृतीमुळे मूलवडसह पस्तीस आदिवासी गावे कोरोनामुक्त

दिनेशचंद्र तायडे

मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे पस्तीस गावे आजपर्यंत कोरोनामुक्त आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.


मूलवड (जि. नाशिक) :
मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे पस्तीस गावे आजपर्यंत कोरोनामुक्त आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता फेब्रुवारीतच कोरोना संकटाचे नियोजन केले होते. (corona has been evicted from 35 tribal villages including mulwad due to public awareness)

जनजागृती व लवकर उपचार ठरले महत्वाचे

गावोगावी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती, वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर, बाहेर गावाहून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून घेणे, सॅनिटायझरचा वापर करणे, प्रत्येक गावातील आशावर्करमार्फत स्त्रियांचे प्रबोधन, प्रत्येक गावात जाऊन आरोग्य तपासणी, लक्षणे जाणवताच तत्काळ उपचार करणे या विषयी जागृती केली. या भागातील जनतेने आरोग्य विभागाला प्रतिसाद देत कोरोना नियमांचे पालन करत शिस्तीचे ही पालन केले. तसेच या भागातील नागरिक किरकोळ आजारासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा ही वापर करतात. या गोष्टींच्या जोरावर मूलवड प्राथमिक आरोग्य केंद्राने जवळपास पस्तीस गावे कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळवले. डॉ. पाटोळे यांनी सांगितले, की, या भागातील लोक जास्तीत- जास्त शारीरिक कष्टाची कामे करतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी व रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. वेळोवेळी कोरोनाविषयी जनजागृती व लवकर उपचार करण्यामुळे ही गावे आजपर्यंत कोरोना मुक्त आहेत.

(corona has been evicted from 35 tribal villages including mulwad due to public awareness)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT