coronavirus-2-1580265226. 
नाशिक

सलग चौथ्या दिवशी जिल्‍ह्‍यात एक हजारहून कमी कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या अधिक राहिली. तर सलग चौथ्या दिवशी नव्‍याने आढळणार्या बाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी राहिली आहे. मंगळवारी (ता.६) दिवसभरात नव्‍याने ८७२ बाधित आढळून आले. तर ९८३ रूगणांनी कोरोनावर मात केली आहे. बारा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झालेला आहे.

दिवसभरात आढळले ८७२, तर ९८३ कोरोनामुक्‍त, बारा मृत्‍यू

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५८९, नाशिक ग्रामीणचे २३४, मालेगावचे २८ तर जिल्‍हाबाह्य २१ रूग्‍णांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३३५, नाशिक ग्रामीणचे ६०२ आणि मालेगावच्‍या ४६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरातील बारा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणच्या पाच रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा ८१ हजार ८९५ झाला आहे. यापैकी ७१ हजार २५५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, १ हजार ४६३ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. सद्य स्‍थितीत ९ हजार १७७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल झालेल्‍या संशयितांची संख्या लक्षणीय राहिली. नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ४८०, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १६५, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १५ संशयित दाखल झाले आहेत. जिल्‍हा रूग्‍णालयात आज एकही संशयित दाखल झाला नाही. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८८९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी १ हजार २०३ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

शहरातील कोरोनामुक्‍तांची संख्या पन्नास हजार

जिल्‍ह्‍यातील सर्वाधिक रूग्‍ण नाशिक महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. या परीसरात आतापर्यंत ५५ हजार ०७७ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी ५० हजार ००९ रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. ७८३ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, शहरातील ४ हजार २८५ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT