real estate  esakal
नाशिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Real Estate ची थंडावली उलाढाल; व्यावसायिक अडचणीत

दीपक आहिरे

पिंपळगांव बसवंत (जि.नाशिक) : दोन वर्षांपूर्वी आलेली आर्थिक मंदीची लाट, (Economic downturn) गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट (corona first wave) व या वर्षी दुसऱ्या लाटेने कहर केल्याने बांधकाम क्षेत्र (real estate) पुन्हा कोसळले आहे. दोन महिन्यांपासून पुन्हा टाळेबंदी झाल्याने रिअल इस्टेटची उलाढाल प्रचंड थंडावली आहे. (Corona second wave affect real estate turnover)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रिअल इस्टेटची उलाढाल थंडावली

सदनिका, गाळे खरेदीसाठी ग्राहक पुढे येत नसल्याने व्यावसायिकांचा कर्जाचा बोजा वाढला आहे. जीवन-मरणाची ही लढाई कुठे घेऊन जाणार, याचा अंदाज नसल्याने व कधी रुग्णालयात पैसे लागतील, याचा नेम नाही. त्यामुळे नागरिक गुंतवणुकीऐवजी रोख रक्कम स्वत:जवळ ठेवण्याचा पर्याय अवलंबत आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, ओझर परिसरात ५०० हुन अधिक सदनिका, तर सुमारे दोन व्यावसायिक गाळे पडून आहेत.

सदनिका पडून असल्याने व्यावसायिक अडचणीत

मंदी व कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत डिसेंबर २०२० पासून रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा रुळावर आले होते. पण, दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याने व्यावसायिक, नोकरदारांचे अर्थकारण विस्कळित झाले. लॉकडाउनमुळे याच्या झळा सर्वत्र बसू लागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. यंदाही अगदी हंगाम काळात एप्रिलपासून कोरोनाने हातपाय पसरल्याने अगदी व्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या काळात सर्व ठप्प झाले आहे.

बांधकाम क्षेत्राला दृष्ट

पिंपळगाव बसवंत, ओझर शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आलेले नागरिक हक्काच्या घराचे स्वप्न पाहतात. दोन्ही शहरात रिअल इस्टेट मार्केट प्रचंड तेजीत होते. बांधकाम क्षेत्र उभारी घेत असल्याने पिंपळगाव व ओझरचा विस्तार झाला. मात्र, दोन वर्षांपासून संकट घोंगावू लागल्याने बांधकाम क्षेत्राला दृष्ट लागली आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कामगारांची गरज असते. मात्र, गेल्या वर्षीपासून परप्रांतीयांनी काढता पाय घेतला. त्यामुळे स्थानिक पातळीवर कामगार मिळत नाही. मिळाले तर दुपटीने मजुरी मोजावी लागते.

१०० कोटींची उलाढाल थांबली...

लॉकडाउनच्या निर्बंधाने बांधकाम क्षेत्रावर बुलडोझर फिरविल्यासारखी स्थिती आहे. पिंपळगाव बसवंत व ओझर शहरात विक्रीअभावी पडून असलेली सदनिका, व्यापारी संकुले, अर्धवट बांधकामे यामुळे सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी सदनिका, गाळे विकणे असल्याचे फलक दिसतात. सणासुदीच्या मुहूर्तावर होणारे बुकिंग होत, तर नाहीच उलट बुकिंग केलेल्या ग्राहकांनी ती रद्द केली. कोरोनामुळे मंदीचा फेरा एवढा घट्ट बसला आहे, की ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वावर विक्री सुरू आहे. पिंपळगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्रीच्या नोंदी करण्यासाठी असलेली गर्दी ओसरली असून, तेथे शुकशुकाट दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सर्वाधिक झळा बांधकाम क्षेत्राला बसत आहेत. अस्तित्वाची लढाई असल्याने नागरिक गुंतवणुकीऐवजी रुग्णालयात पैसे लागू शकता, या चिंतेने रोकड हाती ठेवत आहेत. काही ठिकाणी बुकिंग रद्द झाले आहेत.- बाळासाहेब डोखळे, बांधकाम व्यावसायिक, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT