corona virus sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात पुन्‍हा पॉझिटिव्‍ह रुग्णांचा आकडा शंभरी पार

अरुण मलाणी

नाशिक : ऑक्‍टोबर महिन्‍यात तिसऱ्यांदा दैनंदिन कोरोनाबाधितांच्‍या संख्येने शंभराचा आकडा ओलांडला. बुधवारी (ता. २०) जिल्‍ह्यात ११५ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ८२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत ७७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बाधितांची संख्या सर्वाधिक राहत आहे. बुधवारी नाशिक ग्रामीणमधील ७२, नाशिक शहरातील ३७, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाहेरील चौघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

प्रलंबित अहवालांच्या संख्येतही वाढ होत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत ९३५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ५७९ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील होते. नाशिक शहरातील १३२, मालेगावच्या २२४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३११ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी २९७ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील सात रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश होता.

जिल्‍ह्यातून एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख १० हजार २२४ झाली असून, यापैकी चार लाख ७८५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली आहे. आतापर्यंत आठ हजार ६६१ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT