Corona esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात चार दिवसांनंतर शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित

अरुण मलाणी

नाशिक : चार दिवसांपासून जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या शंभरापेक्षा अधिक राहत होती. शुक्रवारी (ता. १३) जिल्‍ह्यात ७८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तीनने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार १२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


शुक्रवारी नाशिक महापालिका हद्दीतील ३५, नाशिक ग्रामीणमधील ३२, मालेगावच्‍या एकासह जिल्‍हाबाहेरील दहा बाधितांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दुसरीकडे ७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. जिल्‍ह्यात दोन रुग्‍णांचा कोरोनाने बळी घेतला. यात प्रत्‍येकी एक मृत नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहे.


यापूर्वी ८ ऑगस्‍टला जिल्‍ह्यात ९९ कोरोनाबाधित आढळले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ९७६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ६५५, नाशिक शहरातील १९१, मालेगावच्‍या १३० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ४७४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील १९ रुग्‍णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT