Corona Vaccination Sakal
नाशिक

लसी अभावी नाशिकमध्ये नगरसेवकांच्या उत्साहाचा फुटला फुगा

विक्रांत मते

नाशिक : शहरात लसीकरण (Corona Vaccination) केंद्राला मंजुरी मिळाल्याचा गाजावाजा करणाऱ्या नगरसेवकांच्या उत्साहाचा फुगा शनिवारी (ता. ३) केंद्रावरील वाढलेली गर्दी व अनेकांना लस न घेताच परतावे लागल्याने फुटला. सत्तर केंद्रांवर प्रत्येकी १४० लसींचा पुरवठा करण्यात आला. अवघ्या दोन तासांतच लसींचा साठा संपुष्टात आल्याने सकाळपासून केंद्रांवर रांगा लावलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. (corona-vaccine-shortage-in-nashik-marathi-news)

केंद्र मंजूर पण लसच उपलब्ध नाही

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. सुरवातीला फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. त्यानंतर ६५ वयोगटांपुढील लसीकरणाला सुरवात झाली. ४५ पुढील वयोगटांसाठी नंतर लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आली. परंतु मेच्या पहिल्या आठवड्यामध्येच लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडाला. त्यानंतर पुन्हा निर्णय मागे घेताना ४५ वयोगटांपुढील नागरिकांसाठीच लसीकरण मोहीम सुरू ठेवली. आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून सरसकट १८ वयोगटांपुढील नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. त्यानुसार नागरिकांची गर्दी वाढणार असल्याने नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये लसीकरण मंजूर करून घेतले. केंद्र मंजूर झाले तरी लस उपलब्ध होईल की नाही, याबाबत साशंकता होती. त्याप्रमाणेच घडले. अनेक केंद्रांवर सकाळी ६ पासून नागरिकांनी रांगा लावल्या, मात्र पहिल्या शंभर लोकांनाच लस मिळाल्याने उर्वरित नागरिकांना माघारी फिरावे लागले.

प्रत्येक केंद्रावर १४० डोस

महापालिकेने सुरवातीला ३१ केंद्रे घोषित केली होती. परंतु नगरसेवकांच्या आग्रहाखातर ४१ केंद्रे वाढविण्यात आली. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर लस समप्रमाणात वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. शनिवारी महापालिकेला जिल्हा रुग्णालयाकडून अकरा हजार ८० लस प्राप्त झाल्या. त्यानुसार सत्तर लस केंद्रांवर प्रत्येकी १४० लसचे वाटप करण्यात आले. एकूण ७० लसीकरण केंद्रांपैकी पूर्व विभागात सहा, पश्‍चिम विभागात बारा, नाशिक रोड विभागात नऊ, सातपूर विभागात आठ, सिडको विभागात दहा, तर पंचवटी विभागात आठ लसीकरण केंद्रे होती.

(corona-vaccine-shortage-in-nashik-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT