corona wave is alarming in nashik niphad marathi news
corona wave is alarming in nashik niphad marathi news 
नाशिक

कोरोनाची नाशिकसह निफाडमध्ये लांबलेली पहिली लाट चिंताजनक; वाचा सविस्तर बातमी

महेंद्र महाजन

नाशिक : नाशिक शहर व तालुका आणि निफाडमध्ये सद्यःस्थितीत सुरू असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची पहिली लाट लांबली असून, चिंताजनक अवस्थेत पोचली आहे. त्याच वेळी गेल्या महिन्याभरापासून ऑक्सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांचे २ टक्क्यांनी वाढलेले प्रमाण कायम आहे. ७ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासते आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाठी आवश्‍यक असलेल्या ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असली, तरीही कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने गरज आणि पुरवठ्यात पुन्हा तफावत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दुसरी लाट लांबण्यामागे या गोष्टी जबाबदार

कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेबरोबर शहर आणि जिल्ह्यातील सद्यःस्थितीबद्दलची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. नाशिक शहरात रुग्ण वाढत असताना सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, निफाड या तालुक्यांतील रुग्णसंख्या यापूर्वी वाढली होती. शारीरिक अंतर न राखणे, दाट लोकवस्ती, कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांच्या बाजारपेठेच्या अनुषंगाने वाढलेल्या हालचाली अशी कारणे पहिली लाट चिंताजनक अवस्थेत पोचण्यास कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. इगतपुरी, दिंडोरीप्रमाणे बागलाण, देवळा तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची पहिली लाट पूर्ण झाली आहे. कळवण तालुक्यात रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. सिन्नरमध्ये दुसरी लाट लांबण्यासाठी नेमकी कोणती कारणे आहेत, याचा शोध घेतल्यावर काही बाबी पुढे आल्या, त्या म्हणजे, नाशिक-पुणे महामार्ग आणि मुंबई, उपनगर, ठाणे या भागातून घरी आलेले रहिवासी. सिन्नर तालुक्यात बाहेरून आलेल्यांमुळे अख्खे कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण आरोग्य विभागाला आढळून आले आहे. 

रुग्ण वाढताच ऑक्सिजनची समस्या 

उद्योगांसाठी लागणारा जवळपास सात टन ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्जिसन उपलब्ध होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील शंभर रुग्णांना सरासरी दोन हजार लिटरप्रमाणे दिवसाला २८ लाख ८० हजार लिटर ऑक्सिजनची आवश्‍यकता भासते. ६० हजार किलोलिटर लिक्विड ऑक्सिजनची टाकी दिवसाआड भरली जाते. शिवाय २० हजार किलोलिटरच्या दोन टाक्या भरून घेतल्या जातात. जिल्ह्यासाठी दिवसाला १५० जम्बो सिलिंडरची आवश्‍यकता भासते. एका जम्बो सिलिंडरमध्ये सहा हजार लिटर ऑक्सिजन असतो. मात्र, रुग्णसंख्येने आज दोन हजारांचा टप्पा ओलांडला असल्याने त्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढताच, सध्याची ऑक्सिजन उपलब्धता कमी पडणार असे दिसते. याच अनुषंगाने ऑक्सिजन उत्पादकांशी संवाद साधल्यावर लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी यंत्रणेने टँकरची उपलब्धता करणे आवश्‍यक असल्याची बाब पुढे ठेवली. 


दिलासादायक स्थिती 

० दुसरी लाट येऊन गेलेला तालुका : येवला 
० दुसरी लाट उतरतीला लागलेला तालुका : मनमाडसह नांदगाव 
० पहिली लाट ओसरून थांबलेला तालुका : चांदवड 
० लाट नसलेले तालुके : पेठ, सुरगाणा 
० तुरळक रुग्णसंख्या असलेला तालुका : त्र्यंबकेश्‍वर 

दुसरी लाट कायम 
सिन्नर 
मालेगाव ग्रामीण 

कोरोनाग्रस्तांची वयनिहाय स्थिती 

वय, पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यू, पुरुष, महिला, एकूण पुरुष, महिला एकूण 
०-१२, १ हजार ९३६, १ हजार ५५२ ,३ हजार ४८८, १ ,०, १ 
१३-२५, ५ हजार १८१, ३ हजार ७७२, ८ हजार ९५३, ७, ९, १६ 
२६-४०, १२ हजार ४७१, ६ हजार ८७६, १९ हजार ३४७, ६६, २२, ८८ 
४१-६०, १२ हजार ६१, ७ हजार ३, १९ हजार ६४, ३१४, १३९, ४५३ 
६० च्या पुढे, ४ हजार २६६, २ हजार ८७०, ७ हजार १३६, ३८९, १६०, ५४९ 
एकूण ३५ हजार ९१५, २२ हजार ७३, ५७ हजार ९८८, ७७७, ३३०, १ हजार १०७ 
(कोविड केअर सेंटरमध्ये २, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एक हजार १०४ मृत्यू झाले. ९९७ जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता.) 
(मृतांमध्ये कोमऑरबिडिटीच्या ६५९, उच्च रक्तदाबाच्या १५९, मधुमेहाच्या १७४, श्‍वसनविकाराच्या ४१ आणि इतर आजारांच्या ७४ जणांचा समावेश आहे.) 
(१३ जण उपचारासाठी नेताना मृत झाले. उपचारासाठी दाखल केल्यावर पहिल्या दिवशी २५२, दुसऱ्या दिवशी १५६, तिसऱ्या दिवशी १०२, चार दिवसांहून अधिक दिवसांमध्ये ५८४ जणांचा मृत्यू झाला.) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT