नाशिक

लाचखोर अभियंत्याचा जामीन फेटाळला

CD
लाचखोर अभियंत्याचा जामीन अर्ज फेटाळला साथीदार कनिष्ठ अभियंत्याला जामीन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : पिंप्री खुर्द येथील रस्ता कॉंक्रिटीकरण बिलाच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी अटकेतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. याच प्रकरणातील कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अटी-शर्तीवर त्यांना जामीन मंजूर झाला. पिंप्री खुर्द येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाची एमबी (मोजणी पुस्तिका) व बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर अभियंता चवरे यांनी बिलांवर सही करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्क्यांप्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडअंती दहा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना पोलिस कोठडी मिळाली. दोघांना न्यायालयात हजर केले. शिसोदे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची कारागृहात रवानगी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री, अभिनेत्यासह तिघांना अटक; आधी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर...

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT