नाशिक

झेडपीच्या त्या लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीचे घबाड

CD
‘त्या’ लाचखोर अभियंत्याकडे कोट्यवधीचे घबाड घरात रोकड, लॉकरमध्ये दागिने; ५ कोटी १६ लाखांची अपसंपदा एसीबीच्या हाती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे (वय ५५) याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली असून, तपासादरम्यान अपसंपदेची चौकशी करण्यात आली. घरझडती आणि बँक लॉकरमध्ये तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता, रोकड, सोने-चांदीचे दागिने व प्लॅटिनमचा ऐवज मिळून आला. स्ता काँक्रिटीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सतीश शिसोदे, त्याच्या पत्नीच्या बँक लॉकरची बुधवारी (ता. ४) तपासणी करण्यात आली. त्यात दोन किलो ५२४.१८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ११ किलो ६३३.७ ग्रॅमचे दागिने, १०१.०२ ग्रॅमचे प्लॅटिनम दागिने, असा एकूण तीन कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचे दागिने जप्त केले. शिवाय शिसोदे याच्या नावे आदर्शनगरमध्ये ४५ लाख व ६५ लाख रुपयांची दोन घर आहेत. घरात २४ लाख ३९ रुपयांच्या वस्तू आहेत. कारवाईत सहभागी पथक उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने घर झडती, मालमत्ता तपासणीसह विविध बँकामधील लॉकर उघडून त्याची तपासणी केल्यावर ही मालमत्ता मिळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT