संक्षिप्त
कापूस वेचणीला
जिल्हाभरात गती
जळगाव : खानदेशात पाऊस नाही. काही भागात मध्यंतरी हलका पाऊस झाला आहे. परंतु अनेक भागात पाऊस नसल्याने कापूस वेचणीस गती आली आहे. कापूस वेचणीचे काम जळगाव, चोपडा, जामनेर, पारोळा व अन्य भागात सुरू झाले आहे. कापूस पीक यंदा कमी आहे. यामुळे कापसाची आवक खानदेशात कमी आहे. कापूस वेचणी करून त्याची लागलीच शेतकरी वाळवणूक करून घेत आहेत. कारण ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरण आहे. कापसात ओलावा राहिल्यास तो पिवळा होतो. त्याचा दर्जा घसरून त्याला पुढे दर कमी मिळतात. यामुळे शेतकरी कापूस वाळवून घेत असून, नंतर त्याची साठवणूक करीत आहेत. कापूस साठा केलेल्या भागात हवा खेळती राहील, याची काळजी शेतकरी घेत आहेत. पुढे कापूस वेचणीला गती येईल. कापूस वेचणीचे दर सध्या पाच ते सहा रुपये प्रतिकिलो असे आहेत.
सूर्यफूल पेरणी
जिल्ह्यात सुरू
जळगाव : सूर्यफूल पेरणी सुरू झाली आहे. काळ्या कसदार जमिनीत ही पेरणी सुरू असून, शेतकरी त्यासंबंधी कार्यवाही करीत आहेत. सध्या उघडीप असल्याने शेतकरी मशागत करून लागलीच त्यात पेरणी करीत आहेत. अनेक शेतकरी काळ्या कसदार जमिनीत पाट पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करून पेरणी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.