kanchanmala.jpg 
नाशिक

पतीच्या दोन्ही किडन्या निकामी...'ती'ने दिली किडनी!...मात्र, काळाला काही वेगळेच होते अपेक्षित...संघर्षमय प्रवास

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (निफाड) सत्यवानाचे प्राण वाचविण्यासाठी आधुनिक सावित्रींनी आपली किडनी देत जीवदान दिले. मात्र, दोनच महिन्यांत त्यावर विरजन पडले अन्‌ 28 व्या वर्षी अकाली वैधव्य आलेले असतांना देखील प्रा. कांचन हुजरे यांनी स्वतःच्या दुःखाला बाजूला सारत संघर्षमय प्रवास करत मुलांना शिकवित आहे. 

तीने स्वतः किडनी दिली, मात्र काळाला काही वेगळेच अपेक्षित

दात्याने येथील कर्मवीर वसंतराव पवार विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कांचनमाला हुजरे यांचा विनोद पाटील यांच्याशी विवाह झाला. विवाहनंतर त्यांना मुलगी व मुलगा झाल्यानंतर पती विनोद पाटील यांची युंगाडा येथे नियुक्ती झाल्यानंतर त्या पतीसह युंगाडा येथे गेल्या. मात्र, एक वर्षातच पती यांची तब्येत खालविल्याने त्या पुन्हा भारतात आल्या. या वेळी तपासणीअंती पती पाटील यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे आढळले. मग उपचाराकरिता डायलिसिस सुरू केले. मुलगा दहा महिन्यांचा, मुलगी तिसरीला, अशी परिस्थिती समोर उभी राहिली असतांना त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पती व वडिलांकडून नकार मिळाला. पण त्या त्यांच्या निर्णयाशी ठाम होत्या, त्यांनी सीईटी दिली आणि उर्त्तीण झाल्या. बी.एड. ला नंबर लागला आणि बी.एड. पूर्ण केले. त्यानंतर पतीचे किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले. दाता मिळत नसल्याने त्यांनी स्वतः किडनी देण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद येथे शस्त्रक्रिया होऊन श्री. पाटील यांना जीवदान मिळाले. पतीची तब्येतही सुधारली; मात्र काळाला काही वेगळेच अपेक्षित होते. दोन महिन्यांनी रुग्णालयातून घरी जाण्याचे ठरताच तपासणीत इन्फेक्‍शन झाले असल्याचे सांगण्यात आले. डॉक्‍टरांनी प्रयत्न केले असता, त्यांना यश मिळाले नाही आणि श्री. पाटील यांचे निधन झाले. 

पदरात निराशा पडल्याने वडील माहेरी घेऊन आले. नंतर मविप्रमध्ये त्या उपशिक्षिका म्हणून रूजू झाल्या आणि पुन्हा एकदा सर्वांना आधार देत दुःख मनात ठेवले आणि चेहरावर खोटं हसू आणून मुलांसाठी त्या उभ्या राहिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

Spinach Corn Toast Recipe: १० मिनिटांत झटपट तयार करा स्वादिष्ट पालक-कॉर्न टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!

आरोग्याचे ‘बाळ’कडू : किशोरवयीन मुलांतील नैराश्य

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

SCROLL FOR NEXT