On the occasion of the inauguration of the Central Vidhan Sabha War Room, BJP State General Minister Vijay Choudhary, MP Dr. Subhash Bhamre, esakal
नाशिक

Nashik BJP News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर : विजय चौधरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बाराव्या क्रमांकावरून जगात पाचव्या स्थानी आणले.

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशाच्या विकास झाला असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी येथे सांगितले. (country progressing under leadership of Prime Minister Narendra Modi Vijay Chaudhary Nashik BJP News)

सटाणा नाका येथील एकता चौक येथे झालेल्या मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूम उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेश निकम उपस्थित होते.

व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी गटनेते सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, मनीषा पवार, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेख आदी उपस्थित होते.

श्री. चौधरी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर राष्ट्रहिताचे कार्यक्रम राबविले जात आहे. देशातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांना घेऊन पंतप्रधान मोदी हे काम करीत आहे. सबका साथ सबका विकास साधला जात आहे. कोरोना काळात मोफत लस व धान्य दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी श्री. गायकवाड, श्री. कचवे यासह विविध जणांचे भाषण झाले. यावेळी दादा जाधव, लकी गिल, माजी नगरसेवक मदन गायकवाड, संदीप पाटील, इब्राहिम शेख, एखलाक अहमद, सुरेखा पाटील यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान श्री. चौधरी यांनी मालेगाव बाह्य विधानसभा वॉर रुमचे उद्‌घाटन केले. बाह्य विधानसभा निवडणूक प्रमुख देवा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुकेश झुनझुनवाला, सुधीर जाधव, रवीश मारु, दीपक पवार, प्रतिक्षा भोसले, वॉर रुम प्रमुख दीपक जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT