धनादेश न वटल्याने थकबाकीदारांना न्यायालयाचा दणका  esakal
नाशिक

धनादेश न वटल्याने थकबाकीदारांना न्यायालयाचा दणका

कुणाल संत

नाशिक : कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेस दिलेले धनादेश न वटल्याने न्यायालयाने दि. नाशिक मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेडच्या सर्व कर्ज थकबाकीदारांना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी कर्जदारांनी बँकेस धनादेश दिले होते. ते धनादेश न वटल्याने तो पुन्हा बँकेत आल्याने बँकेने त्या थकबाकीदारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायाधीश प्रीती रजपूत, श. उ. देशमुख यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान थकबाकीदारांना दणका देत कारावासाची शिक्षा ठोठावत बँकेची नुकसान भरपाई म्हणून व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने नामको बँकेचे थकबाकीदार छगन ठुबे (रा. ओझर मिग) यांना ५, छाया कागडा (रा. नाशिक) यांना २, ईश्‍वर भागवत (रा. घोटी) यांना ६, संजय भोरगे (रा. औरंगाबाद) यांना ५, ज्ञानेश्‍वर वाबळे (रा. शिर्डी) यांना ३, भिका शिरसाट (रा. दिंडोरी) यांना ४, भानुदास अरगडे (रा. नाशिक) यांना १ वर्ष अशी कारावासाची शिक्षा ठोठावली. जर वेळेत बँकेची नुकसान भरपाई न दिल्याने शिक्षेत वाढही केली आहे. बँकेतर्फे ॲड. अस्लम पटेल, ॲड. कौस्तुभ तांबट, ॲड. शैलेश साबद्रा, ॲड. सुरेखा कुलकर्णी, ॲड. हेमंत गायकवाड, उपसरव्यवस्थापक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत धोंगडे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT