children esakal
नाशिक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती; लहान मुलांसाठी महापालिकेचे 'असे' नियोजन

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना अधिक बाधित करण्याची शक्यता

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरण्याची चिन्हे दिसतं असली तरी तिसरी लाट पहिल्या दोन कोरोना संसर्गाच्या (coronavirus) लाटांपेक्षा भयानक असेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातही लहान मुलांना (children) अधिक बाधित करणार असल्याचे संकेत मिळतं असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून काही नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आय़ुक्तांनी दिली. कशाप्रकारे असेल हे नियोजन..(Covid Hospital beds arrangement for children nashik marathi news)

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना अधिक बाधित करण्याची शक्यता

कोरोना संसर्गाची पहिली लाट एप्रिल महिन्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना संसर्गाचा वेग वाढला. सप्टेंबर व ऑक्टोंबर हे दोन महिने मागील वर्षी हॉट ठरले होते. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरत गेली. जानेवारी महिन्यात कोरोना संसर्ग आहे कि नाही अशी परिस्थिती होती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. मार्च महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत तिप्पट कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसया लाटेचा सामना करताना महापालिकेने दिड हजारांहून अधिक बेडचे नियोजन केले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना अधिक बाधित करणार असल्याचे संकेत मिळतं असल्याने त्यापार्श्‍वभूमीवरमहापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी शंभर बेडचे कोव्हीड सेंटर उभारले जाणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची तयारी

.समाजकल्याण, मेरी वसतीगृह, ठक्कर डोम येथे कोव्हिड सेंटर उभारले तर नवीन बिटको व डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेन्टीलेटर बेडची संख्या वाढविण्यात आली. आता दुसरी लाट किंचित ओसरतं असताना शासनाकडून प्राप्त सुचनांनुसार तिसया लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे.

संबंधित विभागांना सूचना

अंबड एमआयडीसी, ठक्कर डोम व संभाजी स्टेडीअम येथील तिनही कोव्हीड सेंटर मध्ये प्रत्येकी पाचशे ऑक्सिजन बेड, साडे बाराशे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून देणे, पन्नास पेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारणे, महापालिकेचा अधिकाधिक निधी कोव्हीड कामासाठी खर्च करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. तिसया लाटेच्या तयारीचा भाग म्हणून आता लहान मुलांवर कोव्हीड उपाययोजना करण्यासाठी शंभर बेडचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुशंगाने साधनसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

टप्प्याटप्प्याने १०० बेडची व्यवस्था

कोरोनाची तिसरी संभावित लाट लक्षात घेता लहान मुले प्रभावीत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात टप्प्याटप्प्याने १०० बेड करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT