कोरोना कक्षात विनयभंग प्रकरणात दोघांना शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : कोरोना कक्षात बेड साइड असिस्टंट म्हणून ड्यूटीवर असताना एका महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केल्याप्रकरणी संशयितांवर दोषारोप सिद्ध झाले आहेत. दोघा संशयितांना याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमोल सुधाकर तायडे (वय २१) व शंकर नितीन सोनवणे (वय २३, दोन्ही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल २०२१ रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणातील फिर्यादी महिला कोरोना कक्षात बेड साइड असिस्टंट म्हणून ड्यूटीवर कार्यरत होती. त्या दरम्यान आरोपी कोरोना कक्षात आले असता, फिर्यादीने त्यांना तुम्ही येथे का आलात? अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्यामुळे आरोपींनी फिर्यादीचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात (भादंवि कलम ३५४, ५०६, ३४ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे यांनी या प्रकरणाचा तपास करून २१ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, पैकी ५ जणांची साक्ष झाली नाही. या खटल्यात सरकारी वकील म्हणून योगेश मेटकर यांनी काम पाहिले. पैरवी अंमलदार म्हणून पोलिस नाईक सुनील छगन पाटील यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.