नाशिक

चिंचखेडा येथे फटाके मुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा

CD
NVL26B01147 चिंचखेडा : फटाकेमुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा घेताना विद्यार्थी. -------- जय भवानी विद्यालयात ‘फटाकेमुक्त’ दिवाळी नवलनगर, ता. ४ : ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित चिंचखेडा येथील जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा देण्यात आली. मुख्याध्यापक डी. एस. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी पर्यवेक्षक एस. जे. बोरसे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक बोरसे म्हणाले, फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, त्यामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण व मुक्या प्राण्यांना होणारा त्रास, तसेच फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी. दिवाळीचा खरा आनंद हा स्नेह, दिवे, रांगोळी, फराळ आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न फोडता इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शिक्षक एस. आर. अहिरे, एम. डी. पाटील, डी. पी. भोये, बी. एच. पाटील, श्रीमती आर. जे. शिरसाठ, श्रीमती पी. एन. सूर्यवंशी, एस. व्ही. शिरसाठ, श्रीमती एन. डी. सोनवणे, ए. ए. संदांशीव, एच. ए. देसले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Buying Tips: जमीन खरेदी करताना फसू नका! व्यवहाराआधी 7/12 उताऱ्यापासून खरेदीखतापर्यंत 'या' गोष्टी नक्की तपासा!

Explained: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 'इतक्या' मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी; एकाने तर इतिहासच रचला, काय असेल पुढील आव्हान?

IND vs NZ, 1st ODI: आधी अर्शदीपचा तिखट मारा अन् मग विराट कोहलीची वादळी फिफ्टी! भारताची विजयासह वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात

ना वडिलांचं नाव, ना आडनाव! तब्बू फक्त 'तब्बू' नाव का लावते? हे आहे कारण

अतुल परचुरे यांचा शेवटचा चित्रपट पाहिलात का? 'अंत एक प्रारंभ'चा ट्रेलर प्रदर्शित; प्रीमियरची तारीखही ठरली

SCROLL FOR NEXT