पाळधी-तरसोद बायपासवर क्रेन
कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
---
दुसऱ्या क्रेनच्या चालकाचा निष्काळजीपणा उघड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : क्रेनसह खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) व दुसऱ्या क्रेन ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी (ता. २३) बायपासवर काम सुरू असताना, क्रेनचालक मधुकर धनराज पाटील (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी रेल्वे पुलाच्या सिमेंट काँक्रिटचे जाईंट स्लॅप काढण्यासाठी ते क्रेनने वर उचलून धरले होते. पुलाच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या क्रेनचा ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती (वय ५२, रा. बुढाडांड, जि. जियावन, मध्य प्रदेश) याने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट काँक्रिटच्या स्लॅपला खालच्या बाजूने उचलेले होते. मात्र, त्याने खालचा आधार काढून घेतल्याने मधुकर पाटील हे हाताळत असलेल्या क्रेनची रोप वायर तुटून क्रेनसह ते खाली कोसळले. या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने मधुकर पाटील यांना सुरक्षेचे कोणतेही साधने दिले नाही व पुलाच्या खाली सुरक्षा जाळी न बांधता काम केले. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ दीपक वामन पाटील (५०, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी पोलिस दूरक्षेत्रात ठेकेदार हरिओम ओझा व क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.