rural delivery boy esakal
नाशिक

Online Shopping: ग्रामीण भागातही ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ! ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्प, बेरोजगारीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

अरुण हिंगमिरे : सकाळ वृत्तसेवा

Online Shopping : शहरामध्ये आजच्या घडीला दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्याऐवजी ती ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक जोर वाढला आहे. यासाठी देशभरात अनेक नामांकित कंपन्या या वस्तु ग्राहकांना घरपोच देत आहे.

शहरी भागातील हे लोण आता ग्रामीण भागातही पसरू लागले असून ग्रामीण भागातही ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढू लागली आहे. त्यामुळे या ऑनलाइन खरेदीचा थेट परिणाम ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसू लागली आहे.

ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय ठप्प झाले असून यातून बेरोजगारी देखील वाढू लागल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे. (Craze of online shopping even in rural areas Businesses in rural areas stopped unemployment increased nashik news)

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांत आजाराचा संसर्ग पसरू नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या उद्देशाने ऑनलाइन शिक्षण व्यवस्था सुरु केली होती. तो पर्यंत ग्रामीण भागात जवळपास ६० टक्के नागरिकांकडे नातेवाईक व मित्रांसोबत बोलण्यासाठी साधे लहान मोबाईल होते.

परंतु शासनाच्या ऑनलाइन शिक्षणापासून आपले मुले वंचित राहू नये, म्हणून गोरगरीब पालकांनी मोलमजुरी करून वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून अँड्रॉइड मोबाईल फोन खरेदी करून दिले. त्याचवेळी मुलांनी शाळेच्या अभ्यास करण्यासोबतच ऑनलाइन खरेदीला देखील पसंती दिली. त्याची माहिती हळूहळू इतरांना झाली.

ग्रामीण भागात लोकसंख्यानुसार ठरावीक व्यावसायिक असतात आणि त्यांचे नियमित ग्राहक देखील ठरलेले असतात. मात्र जसे जसे ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईलची संख्या वाढली तसे तसे उपलब्ध माहितीचे मोठे भांडार उघडे झाले आहे.

जाहिरातींचा मारा यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, चप्पल इत्यादी वस्तू अगदी गावखेड्या सह वाड्या- वस्त्यांवर घरपोच मिळत आहेत. अशा खरेदीमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये बेरोजगारीचा अदृश्य परिणाम होऊ लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, कापड दुकानदार, टेलर, भांडे विक्रीचे, चप्पल बूट विक्रेते, इलेक्ट्रिक वस्तूंचे विक्रेते, तसेच जनरल स्टोअर्स इत्यादी व्यवसाय करणारे हातावर हात धरून बसले आहेत.

स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करा

'फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम), मुंबई' ने राज्यातील नागरिकांना सणासुदीच्या काळात व इतर दिवशी नागरिकांनी आपल्याला आवश्यक सामानाची खरेदी स्थानिक बाजारातील दुकानांमधून करावी, शहरातील पैसा शहरातच फिरविणे आवश्यक आहे असे आवाहन केले.

स्थानिक दुकानदार सर्व प्रकारचे कर भरून स्थानिक विकासाला हातभार लावतो. सण-उत्सव, जयंती-पुण्यतिथीला वर्गणी देतो.

वेळप्रसंगी उधार सामान देणारा आणि सुख-दुःखात रोख पैसे देणारा देखील गावातील दुकानदारच असतो. ऑनलाइन विक्रेत्यांच्या स्थानिक विकासात हातभार नसतो. याचा स्थानिक नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar may become Vice President: बिहारमध्ये मोठा ‘GAME’ होणार!, भाजपचा मुख्यमंत्री अन् नितीशकुमार थेट उपराष्ट्रपती?

Indapur Crime : इंदापुर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी! जबरी चोरीच्या गुन्ह्यासह 22 गुन्ह्यांची उकल; एका अल्पवयीनसह दोघांना अटक

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani: अशी बनवा मस्त मसालेदार 'कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी', लगेच नोट करा रेसिपी

Pratap Sarnaik: नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकरच होणार खुला, परिवहन मंत्र्यांनी 'ती' वेळच सांगितली

SCROLL FOR NEXT