artist sanjay padavi paintings esakal
नाशिक

Nashik News: चांदवडच्या आदिवासी तरुण संजयकडून रेघांच्या घोळक्यामधील चित्रांची निर्मिती!

सकाळ चित्रकला स्पर्धेतून मिळाली प्रेरणा

प्रा. आनंद बोरा

Nashik News : चांदवडमधील आदिवासी तरुण संजय पडवी साकारतोय रेघांच्या घोळक्यातील चित्रे. या कलेला ‘रेघो शैली’ म्हणून संबोधले जात आहे.

‘सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेतून मिळालेल्या प्रेरणेमधून चित्रकलेची आवड निर्माण झाल्याचे सांगत संजयने आदिवासी संस्कृती या कलेतून पुढे नेण्याचे ठरवले आहे. (Creation of pictures from tribal youth Sanjay of Chandwad Nashik News)

उच्च शिक्षित असलेला संजय पाडे आणि गावांना भेटी दिल्यानंतर घरी आल्यावर रेघो शैलीचा वापर करून चित्र साकारतो. आतापर्यंत त्याने तीनशेहून अधिक या शैलीतील चित्र तयार केली आहेत.

चित्र काढल्यानंतर त्या चित्रावर संजय कविता करतो. संजय आपल्या कलेविषयी सांगताना म्हणाला, की रेषांच्या घोळक्यातील चित्र म्हणजे, ‘रेघो शैली’ असून एका पानावर कशाही रेघा मारून नंतर त्यामधून चित्र साकारण्याची ही कला आहे.

शाळेतील कला शिक्षक जे. एम. शिंदे यांनी मला प्रेरणा दिली. अडीच ते तीन तासात एक चित्र तयार होते. शास्रीय संगीताची आवड असल्याने रागांची ओळख लहानपणी झाली होती. या लहरींना कागदावर आणण्याच्या प्रयत्न मी करत असे.

रेघोट्यांमधून पक्षी, रामायण, महाभारत, मानव सदृश आकृत्यांची निर्मिती होत होती. जेल पेनद्वारे संजय चित्रे रेखाटतो. एकाग्रता निर्माण करणारी ही शैली असून विद्यार्थ्यांना ही कला शिकविण्यासाठी तो सध्या प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रेघोट्या ओढल्यानंतर मनातील विचार आणि रेघा एकत्र येऊन निर्माण होते. विविध रागांना त्याने चित्रात रूपांतर केले आहे. हरणांच्या कळपाला आकर्षित करणारा तोडीराग, रागिणी रागातून तानपुरा वाजवणारी महिला त्याने साकारली.

आदिवासींना रेखाचे ज्ञान परंपरेने मिळाले असल्याने ते गुण माझ्यात आले असावे, असे सांगून संजय म्हणाला, की रेषा चित्रांचा जनक हा आदिवासी असून वारली कला हे त्याचे ज्वलंत आहे. आदिवासींची कला देशभरात पोहचविण्याचे काम करत ही स्वनिर्मित कला देशभर घेवुन जायची आहे. चित्र आणि त्यावर तयार केलेली कविता याचे एक प्रदर्शन भरवण्याची इच्छा आहे.

"पानावरील रेघोट्यामधून सुंदर चित्र साकारता येते. हे माझ्या ‘रेघो शैली ने दाखवून दिले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये कलेची निर्मिती करण्यात यशस्वी झालो. भटकंती करताना जे डोळ्याला दिसते ते काळात-नकळत रेघांच्या चित्रात उतरते." - संजय पडवी, चित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT