Nashik: Removing unauthorized hoardings from the direction boards in the city esakal
नाशिक

Nashik: होर्डिंग्स लावून ‘भाईगिरी’ करणाऱ्यांना लावणार ‘मोक्का’! 'बर्थ-डे भाई' विरोधात गुन्हा; पोलीस आयुक्तांचा दणका

122 अनधिकृत होर्डिंग्स काढले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात जागोजागी बेकायदेशीररित्या होर्डिंग्स्‌ उभारून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दणका दिला आहे.

दोन दिवसात सुमारे १२२ होर्डिंग्स हटविण्यात आले. तर, शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाढदिवसाचे होर्डिंग करीत ‘भाईगिरी’ करणाऱ्याविरोधात थेट सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार निष्पन्न झाला आहे.

पोलीस आयुक्तांनी होर्डिंग्स्‌ लावून भाईगिरी करणाऱ्यां विरोधात ‘मोक्का’अन्वये कारवाईचे संकेत दिले आहेत. या कारवाईचे जागरुक नाशिककरांकडून स्वागत होते आहे.

शहरातील चौक, दिशादर्शक फलक झाकून त्यावर अनधिकृतरित्या होर्डिंग्सबाजी केली जात होती. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या अधिकृत जागांवरही भाईगिरी करणाऱ्यांकडून अनधिकृतरित्या बॅनरबाजी करीत शहराच्या विद्रुपीकरणात भरच घातली होती.

याविरोधात मनपाकडून कधी कारवाई तर कधी सोयीस्कर दूर्लक्ष होत असल्याने भाईगिरी करणाऱ्यांची मजल वाढतच चालली होती.

अखेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोलिसांनी मनपाच्या अतिक्रमण विरोधीपथकाच्या मदतीने कारवाई करीत गेल्या दोन दिवसात १२२ होर्डिंग्स काढले.

यामुळे अनेका चौकांसह दिशादर्शक फलकांनीही मोकळे झाल्याने, शहरात पर्यटनानिमित्ताने येणार्यांना मोठा दिलासा मिळाला. तर या कारवाईचे सुजाण व जागरुक नाशिककरांनी स्वागतच केले आहे.

बॅनरवरचा बर्थ-डे बॉय निघाला गुन्हेगार

सीबीएस चौकात महापालिकेचे अधिकृत दोन जाहिरात फलक लावण्याचे स्ट्रक्चर आहेत. या ठिकाणी ‘सुरेश भाऊ राजपूत आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा आशयाचे दोन होर्डिंग्स लावण्यात आले होते.

सदरचे होर्डिंग्स अनधिकृतरित्या लावण्यात आलेले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अंमलदार सुरेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित सुरेश राजपूत (रा. चुंचाळे, अंबड) याच्याविरोधात बॅनरवर स्वतःचे मोठे फोटो लावून जनतेत भीती पसरविण्याचा आणि वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, संशयित राजपूत हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

होर्डिंग्स्‌विरोधी कारवाई

आडगाव - ३,

इंदिरानगर - ४७,

उपनगर - ७,

आडगाव -१,

भद्रकाली - १०,

पंचवटी - ७,

मुंबई नाका -४,

सरकारवाडा - १२,

गंगापूर - ८,

एकूण : ९९

"शहरात होर्डिंग्स लावून गुंडागिरी, भाईगिरी करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’अन्वये गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल. असे कोणी करीत असेल तर त्याची माहिती थेट पोलिसांना कळवावी."- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT