nashik police esakal
नाशिक

नाशिकमध्ये खासदार, आमदारांसह नगरसेविकांविरुद्ध गुन्हा दाखल

युनूस शेख

नाशिक : कोरोना प्रतिबंधक आदेशाचे (corona virus) उल्लंघन करत बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून द्वारका चौकात आंदोलन करण्यात आले. खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, नगरसेविका समिना मेमन, आशा तडवी यांच्यासह असंख्य आंदोलकांवर भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह सदाभाऊ खोत, वाल्मीक सांगळे, गिरीश पालवे यांच्यासह ३० ते ४० आंदोलकांनी बैलगाडी घेऊन एकत्र येत द्वारका चौक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेबाहेर निदर्शने केली होती. तर, मुस्लिम उत्कर्ष समितीतर्फे हनीफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी द्वारका चौकात रास्ता रोको केला होता. (Crime-filed-against-MP-MLA-and-corporators-in-Nashik-marathi-news)

४० ते ५० महिला पुरुष आंदोलकांना घेतले ताब्यात

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करत आंदोलने करण्यात आली. यानिमित्ताने मुंबई नाका पोलिस ठाण्यात खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत, गिरीश पालवे यांच्यासह ३० ते ४० आंदोलनकर्त्यांवर मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे हनीफ बशीर, नगरसेविका समिना मेमन, आशा तडवी यांच्यासह ४० ते ५० महिला पुरुष आंदोलकांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT