डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड sakal
नाशिक

डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड ; संशयित संदीप वाजे याने लग्नातील अडथळा केला दूर

डॉ. वाजेंकडून संदीप वाजे दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोट मागत होता. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. डॉ. वाजेंच्या केबिनमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत दुसरे लग्न करण्यापूर्वी त्यांनी पतीकडे मुलांच्या पालनपोषणासाठी ३० लाखांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे : डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांडातील पती संदीप वाजे या संशयित आरोपीला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वाजे यांच्या कारमध्ये नऊ इंची चाकू आढळला आहे. चाकू गाडीत ठेवण्याचा काय उद्देश होता. वाजे याच्या मोबाईलमध्ये डॉ. वाजेंशी झालेले संभाषण डिलीट का केले, याचे उत्तर संशयित संदीप वाजे देऊ शकला नाही. संभाषण काय होते हे समजण्यासाठी मोबाईल फाँरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. ते मिळाल्यावर तपासाला योग्य दिशा मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

डॉ. वाजेंकडून संदीप वाजे दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोट मागत होता. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. डॉ. वाजेंच्या केबिनमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत दुसरे लग्न करण्यापूर्वी त्यांनी पतीकडे मुलांच्या पालनपोषणासाठी ३० लाखांची मागणी केली होती. रक्कम वाचावी व दुसरे लग्नही व्हावे, यासाठी लग्नातील हा अडथळा दूर करण्यासाठी वाजे यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. घटना घडली त्या दिवशी नवीन गाडी घेतली तिची पार्टी द्यावयाची या कारणाने बाहेर जाणार असल्याचे डॉ. वाजेंना संदीप वाजे याने सांगितले होते. ही बाब त्यांनी घरी सांगितली होती; परंतु संदीप वाजे याने डॉ. वाजे यांना सायंकाळी फोन करून महामार्गावर बोलविले होते. यापर्यंतचे लोकेशन पोलिसांना मिळाले आहे. यापुढील दोघांचे लोकेशन फाँरेन्सिक लॅबकडून मिळण्याची अपेक्षा आहे. यावरूनच पुढे तपासाची दिशा मिळणार असल्याचे तपासी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

Ambegaon Rain : आंबेगाव पूर्व भागात मान्सूनचा दमदार प्रवेश; वादळी पावसाने झाडे कोसळली, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra politics : जनतेच्या सहभागाशिवाय आंदोलनांना अर्थ नाही; महागाई, महाराष्ट्र धर्म आणि प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर डॉ. अमोल कोल्हे यांचे स्पष्ट मत

SCROLL FOR NEXT