Mumbai Naka Police with purse theft suspects esakal
नाशिक

Nashik Crime: तब्बल 8 महिन्यानंतर गुन्ह्याची उकल; प्रवासी महिलेची पर्स चोरी करणारा संशयित अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : प्रवासी महिलेची सोन्याची पोत आणि पर्स चोरी करणाऱ्या संशयितास मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने अटक केली. तब्बल आठ महिन्यानंतर गुन्ह्याची उकल करण्यास त्यांना यश आले.

पर्स, साडेचार तोळे सोन्याची पोत, दोन महागडे मोबाईल, डेबिट क्रेडिट कार्ड असा सुमारे १ लाख ३२ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. १८ डिसेंबर २०२२ ला सकाळी घटना घडली होती. (Crime solved after 8 months suspect who stole purse of traveling woman arrested Nashik Crime)

तक्रारदार पाथर्डी फाटा येथील हर्षदा गवांदे कुटुंबीयांसह पुण्याहून परतत द्वारका चौकात आले. सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात संशयिताने त्यांची पर्स लंपास केली.

साडेचार तोळ्याची सोन्याची पोत, दोन महागडे मोबाईल, क्रेडिट आणि डेबिट कार्ड असा ऐवज पर्समध्ये होता. हर्षदा यांच्या तक्रारीवरून १८ डिसेंबर २०२२ ला मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार समीर शेख, गणेश बोरणार यांना संशयित सिंहस्थनगर सिडको येथे राहत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सूरी, सहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास सोनार, समीर शेख, गणेश बोरणार, नवनाथ उगले यांनी सिंहस्थनगर सिडको येथे दाखल होत संशयित रतिलाल पंडित याळसे (३३, रा. सिंहस्थनगर सिडको) यास ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोन्याची पोत, दोन मोबाईल, कार्ड तसेच पर्स असा १ लाख ३२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT