make noise crime will filed city police warning in background of new year Thirty First Nashik Police esakal
नाशिक

Nashik Police: खबरदार! गोंगाट कराल तर...; थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची तंबी

मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झालेले असतानाच, शहर पोलिसांकडूनही कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झालेले असतानाच, शहर पोलिसांकडूनही कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

मात्र, थर्टीफस्ट साजरा करताना गोंगाट, धिंगाणा घातला तर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातील, अशी सज्जड तंबीच शहर पोलिसांनी दिलेली आहे. (make noise crime will filed city police warning in background of new year Thirty First Nashik Police)

थर्टीफस्टचा जल्लोष काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी शहरातील हॉटेल्स, ढाब्यांमध्ये थर्टीफस्ट पार्ट्यांसाठी जय्यत तयारी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ एक व दोन यांच्यासह गुन्हेशाखांना बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

येत्या ३१ डिसेंबरच्या दोन दिवस आधीपासूनच आयुक्तालय हददीमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. रात्री आठ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत तपासणी केली जाणार आहे.

विशेषत: मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, गोंगाट करून धिंगाणा घालणाऱ्यांना लक्ष्य करीत कारवाई केली जाणार आहे. पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त व कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत.

ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ रडारवर

थर्डीफस्टच्या पार्श्र्वभूमीवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईवर पोलिसांकडून भर देण्यात येणार आहे. मद्यपान करून रस्त्यांवरुन गोंगाट करुन धिंगाणा घालणाऱ्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

त्यामुळे गोंगाट करणाऱ्यांना पोलिसांचा दणकाच बसणार आहे.

खबरदारीचे आवाहन

आयुक्तालयाच्या हद्दीतील खासगी आस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृह, हॉटेल्स यांना पोलिस ठाण्यांमार्फत खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत.

कोणताही अनूचित प्रकार घडणार नाही, त्यासाठी खरबदारीचे आव्हान पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

वेळेची अद्याप अनभिज्ञताच

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पहाटेपर्यंत बिअरबार, हॉटेल्स, मद्य शॉपी खुले ठेवण्याबाबत शासनाचे निर्देश जारी केले आहेत.

परंतु त्याबाबत अद्यापपर्यंत पोलिसांपर्यंत आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबतची उत्सुकता ताणलेली आहे.

असा असेल बंदोबस्त

- चार उपायुक्त, सात सहायक आयुक्त

- पोलीस अधिकारी-कर्मचारी

- १३ पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त

- ३ गुन्हे शाखा, ४ गुन्हे शोध पथके

- शहरात नाकाबंदीसह तपासणी

- राज्य राखीव दलाच्या तुकड्या सज्ज

- पाचशेपेक्षा अधिक होमगार्ड; दंगल नियंत्रण पथक; शीघ्रकृती दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT