नाशिक

कडवा कालव्याचे बाविस दिवस आवर्तन मागणी अर्जासाठी उरले तीन दिवस, थकबाकीदार शेतकऱ्यांना पाणी न देण्याचे निर्देश

CD
पान दोन सेकंड मेन ------------------------- 23550 सिन्नर : कडवा कालवा कडवा कालव्याचे २२ दिवसांचे रब्बी आवर्तन पाणी मागणी अर्जासाठी तीनच दिवस शिल्लक; थकबाकीदार पाणी न देण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १७ : कडवा कालव्याच्या लाभ क्षेत्रासाठी रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हे आवर्तन देण्यात येणार असून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयांच्या अधीन राहून सूक्ष्म नियोजन होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जासाठी २० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली असून त्यासाठी आता तीन दिवस उरले आहेत. तर थकबाकीदार असलेली शेतकऱ्यांना पाणी न देण्याचे सरकारचे निर्देश असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाकरिता मागणी आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याने सिंचनासाठी पाणी देण्याचे अधिकार राखून ठेवून रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक होताच हे नियोजन जाहीर केले जाणार असले तरी तत्पूर्वी प्रशासकीय पातळीवर आवर्तनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. ------- थकबाकीदार शेतकरी वगळले पाणीपट्टी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. किमान असे ७०० अधिक शेतकरी असण्याची शक्यता आहे. आवर्तन मिळणार असले तरी त्यावर विसंबून राहून नवीन पीक लागवड करणाऱ्यांनी पीक लागवड करू नये, अशी सूचनाही जलसंपदा विभागाने केली आहे. --------- पिण्याच्या पाण्याला प्राधान्य वडांगळीसह सात गावे, डांबरनाला बंधारा यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या योजनांना प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहेत. जनावरांची तहान भागवण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास प्राधान्यक्रमानुसार बारमाही पिकांना पाणी देण्यात येणार आहे. ------- तर गुन्हे दाखल होणार यापूर्वीचा अनुभव पाहता आवर्तनावेळी कालवा फोडणे, गेट तोडून पाणी पळवण्याच्या घटना घडल्या आहेत. आवर्तन सुरळीत चालण्यासाठी गस्ती पथकांची नेमणूक करण्यात येणार आहेत. कालवा परिसरातील वीज पुरवठा २२ तास बंद ठेवला जाणार आहे. आवर्तनात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अर्ज नमुना सात मुदतीत भरावा, आवर्तन मिळणार म्हणून नवीन पिके लागवड करू नयेत. - सचिन चव्हाणके (उपविभागीय अधिकारी, कडवा कालवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT