Scenes of the scuffle captured on CCTV esakal
नाशिक

Nashik Crime: गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; 2 अल्पवयीन संशयितांसह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : चुंचाळे शिवारातील संजीवनगर शिवारात गुरुवारी (ता. १०) रात्री साडेसातच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणातून एका युवकाचा खून झाला होता. तर एक तरुण गंभीर जखमी झाला होता.

गंभीर जखमी तरुणाचा शुक्रवारी (ता. ११) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओदेखील समोर आला आहे. (Critically Injured Youth Dies During Treatment Four arrested including 2 juvenile suspects Nashik Crime)

अंबडच्या संजीवनगर भागात ही घटना घडली. दोन अल्पवयीन युवक एकमेकांना शिवीगाळ करत होते.

त्याचवेळी त्यांची भाषा न समजल्याने ही शिवीगाळ आपल्याला केली, या गैरसमजातून मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख या दोघांसोबत अल्पवयीन तरुणांचा वाद झाला.

त्यानंतर अल्पवयीन युवकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. याचा राग मनात धरून टोळक्याने मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख यांच्यावर चाकू आणि दांडक्याने हल्ला केला.

या हल्ल्यात मेराज असगर अली खान याचा जागीच मृत्यू झाला. तर इब्राहिम हसन शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात महम्मद शकील गरीब उल्हा खान (४२, रा. संजीवनगर) यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन विधीसंघर्षित बालकांसह साहिल हिरामण लिलके (१९, रा. चुंचाळे शिवार), वैभव ऊर्फ दादा कैलास धोंगडे (२४, रा. खालचे चुंचाळे) यांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. शुक्रवारी मृत इब्राहिम हसन शेख व मेराज असगर अली खान यांच्यावर सातपूर येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway Ticket Transfer Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऐनवेळी प्रवास रद्द झाल्यास तिकीट वाया जाणार नाही; घरच्यांच्या नावावर करता येणार ट्रान्स्फर, वाचा नियम

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

Latest Marathi News Live Update : करवीरला दुष्काळी यादीतून वगळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा

Congress Organizational Reshuffle : काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी; ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT