राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे
---
जिल्हाधिकारी : कर्जवाटपाबाबत तालुकानिहाय मेळावे घ्या
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी आगामी १५ दिवसांत तालुकानिहाय पीककर्ज वाटप मेळावे घ्यावेत, पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाारा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी (ता. ५) येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लीड बँकेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार डोहरे, सर्व बँकांचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापक उपस्थित होते.
रविवारी (ता. ४) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासगी बँकांनी कर्जवाटपाचे लक्ष्यांक पूर्ण न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सोबतच बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली; तर संबंधित बँकेला जबाबदार धरण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी घुगे यांनी सोमवारी दुपारी सर्व बँकर्सची बैठक घेऊन लक्ष्यांक पूर्ण न केलेल्या पीककर्ज वाटपाची योजना सांगितली.
ते म्हणाले, की जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. खरिपाचे पीक कर्जवाटपाचा आढावा महसूलमंत्र्यांनी घेतला. त्यात पीक कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे सर्व बँकांनी दिलेल्या पीककर्जाचा लक्ष्यांक येत्या १५ दिवसांत कर्ज देऊन पूर्ण करावा. त्यासाठी तालुकानिहाय मेळावा घ्यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.