In the eastern part of the taluka, the crop failed due to lack of rain. esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: पाऊस न झाल्यामुळे पिके करपली; सिन्नर तालुक्यात पशुधन विकण्याची बळीराजावर वेळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : तालुक्याच्या पूर्व भागातील पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या आहेत. सोयाबीन, बाजरी, टोमॅटो आदी पिके शेतात करपली आहेत. सोयाबीनवर एक ते दोन दिवसांत रोटाव्हेटर फिरवणार आहे, असे देवपूर येथील शेतकरी म्हाळू खोले यांनी सांगितले.

कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने हाती तोंडी आलेला घास डोळ्यादेखत करपत असल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. (Crops fail due to lack of rain Time on farmer to sell livestock in Sinnar taluka nashik)

दोडी येथील शेतकरी तानाजी वाघ यांच्या शेतातील बाजरी करपू लागली आहे. पाऊस नसल्यामुळे बियाणे, मशागतीचा खर्चही वाया गेल्याचे त्यांनी सांगितले. चाऱ्याअभावी जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चारा विकत घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. कांदा, कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. सरकारने तत्काळ पिकांचे पंचनामे करून अनुदान जाहीर करावे व जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. गावोगावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागण्यांची निवेदन अनेक सामाजिक, राजकीय संस्थांनी दिली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. रोज प्रतीक्षा करूनही पाऊस येत नसल्याने दुष्काळाच्या झळा असह्य होत आहेत. पशुधनासाठी बाहेरून चारा आणावा लागत आहे. पशुधन विकण्याची शेतकऱ्यांना वेळ येऊ नये, म्हणून तालुक्यात चारा छावणी सुरू करावी. शासनाने सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व वीजबिल माफ करावे."-मनोज भगत, सिन्नर

"जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी मजल दरमजल फिरावे लागत आहे. शासनाने दुष्काळ भागाची पाहणी करून बळीराजाला न्याय द्यावा व दुष्काळी संकटातून मुक्त करावे." -संतू पाटील-जेजुरकर, जोंगलटेंभी

"सिन्नर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. सरासरीच्या आतापर्यंत केवळ ४५.७ टक्के पाऊस झाला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ज्या गावांचे पंचायत समितीकडून पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव आले, ते प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले. जनावरांच्या छावण्यांचेही प्रस्ताव येत असून, अनेक ग्रामपंचायतींकडून चाऱ्यांचे ठराव येत आहेत."- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर

"सिन्नर तालुक्यात ७०.४६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र, पावसाने वक्रदृष्टी केल्याने यातील अनेक गावांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. सुमारे ४१ गावांमध्ये पावसाअभावी पूर्णपणे खरिपाचे पीक वाया गेले. मीड सीजन ॲडव्हसिटी रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे."

- ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT