SAKAL - 2021-03-22T103519.913.jpg 
नाशिक

दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि.नाशिक) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सगळीकडे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. विवाहाला पन्नास, तर अंत्यविधीसह दशक्रिया विधीसाठी जेमतेम २० नागरिकांना परवानगी दिली आहे. अशातच टाके घोटी (ता. इगतपुरी) या ठिकाणी असा प्रकार घडल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी

कोरोना महामारी संसर्गाचा वाढता धोका पाहता शासनाने साथीचा रोग नियंत्रणात यावा, याकरिता नियमावली ठरवून दिली असताना नियमांचे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सगळीकडे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. विवाहाला पन्नास, तर अंत्यविधीसह दशक्रिया विधीसाठी जेमतेम २० नागरिकांना परवानगी दिली आहे. असे असताना टाके घोटी येथील एका दशक्रिया विधीसाठी तीनशे ते चारशे नागरिकांची गर्दी झाल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यात शनिवार (ता. २०) टाके घोटी येथे स्मशानभूमीजवळ नदीकाठी दशक्रिया विधी कार्यक्रमास सुमारे तीनशे ते चारशे लोकांनी गर्दी करून विधी सुरू असताना कोरोना संसर्गाच्या नियमावलीचे उल्लंघन होताना दिसून आले. या घटनेची तक्रार पोलिस हवालदार राजेंद्र चिंतामण चौधरी यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली. 

परिसरात एकच खळबळ

शासनाने ठरवून दिलेल्या लोकसंख्यापेक्षा अधिक गर्दी जमवून दशक्रिया विधी सुरू असताना समाजात संसर्ग पसरविण्याचे संभाव्य असतानादेखील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाला केराची टोपली दाखवून दशक्रिया विधी सुरू ठेवण्यात आला म्हणून साथीचा रोग प्रतिबंधित कायद्याप्रमाणे दोषींवर गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्लंघन झाल्याप्रकरणी टाके घोटी (ता. इगतपुरी) येथे दोघांवर गुन्हा दाखल झाला. 

मंगल कार्यालये, लॉन्स व गर्दीचे ठिकाणांवर गर्दी न करण्याचे निर्देश असताना काही लोक जाणीवपूर्वक मोठे कार्यक्रम घडवून समाजात साथीचे रोग पसरवित आहेत, अशा लोकांवर शासनाचे नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे. -दीपक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT