corona vaccination corona vaccination
नाशिक

पिंपळगावला लसीकरणासाठी तरुणांची गर्दी; केंद्राबाहेर रांगा

दीपक अहिरे


पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच दोन दिवसांपासून तरुणांची लस घेण्यासाठी केद्रांवर गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच केद्रांवर रांगाच रांगा लागत आहेत. दिवसभर लसीकरणाच्या उद्दिष्टाप्रमाणे नागरिकांना कूपन देण्यात आले. त्यानंतर आलेल्यांचा मात्र हिरमोड झाला. त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. काहींनी रांगा पाहून काढता पाय घेतला. (crowd of youth gathered for corona vaccination in Pimpalgaon)


कोरोना लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थगित केलेले १८ वर्षांपुढील लसीकरण पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला. निफाड तालुक्यात १२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याल आले. मंगळवार (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना गोंधळ उडणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली. त्यासाठी प्रत्येक केद्रांवर दीडशे ते दोनशे डोस पाठविण्यात आले. केद्रांवर कूपन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. कूपन वाटपानंतर नागरिकांना रांगेत घेऊन मोबाईल ॲपवर आरोग्य सेवकांमार्फत रजिस्ट्रेशन करण्यात आले. कूपन संपल्यानंतर केद्रांवर आलेल्या नागरिकांना परत फिरावे लागले. अनेकांनी केद्रांवरील रांगा पाहून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.



केंद्रांची सख्या वाढवणार
प्रत्येक गावात वॉर्डनिहाय लसीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण मध्यंतरी लशींचा तुटवडा असल्याने तो कार्यक्रम बारगळला. आता १८ वयोगटावरील लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुणांची मोठी गर्दी दोन दिवस निफाड तालुक्यातील केंद्रांवर उसळली. निफाड तालुक्यात दोन दिवसांत १८ वयोगटावरील बाराशे तरुणांनी लस घेतली. येत्या काळात लशीचा पुरवठा मुबलक झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार असल्याचे डॉ. चेतन काळे यांनी सांगितले.

(crowd of youth gathered for corona vaccination in Pimpalgaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT