Nashik Vaccination KM_SAKAL
नाशिक

बंदच्या काळातही पंचवटीत लस घेण्यासाठी उसळली गर्दी

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रशासनाने दहा दिवसांच्या कडकडीत बंदची साद समाजातील सर्वच घटकांना घातलेली आहे.

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रशासनाने दहा दिवसांच्या कडकडीत बंदची साद समाजातील सर्वच घटकांना घातलेली आहे. त्यामुळे कालपर्यंत ओसंडून वाहणारे रस्ते, बाजारपेठा गुरुवारी (ता.१३) खऱ्या अर्थाने निर्मनुष्य झाल्या आहे. मात्र याही परिस्थितीत पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात ‘दुसरा डोस’ घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. इंदिरा गांधीसह मायको रुग्णालयात झालेल्या लसीकरणाद्वारे (Vaccination) तब्बल साडेसातशेच्या आसपास नागरिकांचे लसीकरण पार पडले. (Crowds flocked to Panchavati to get vaccinated even during the lockdown)

प्रशासनाने बुधवारी (ता.१२) दुपारी बारापासून २३ तारखेपर्यंत कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे एरवी सकाळपासूनच मोठी वर्दळ व शहरातील मुख्य बाजा पेठ असलेल्या रविवार पेठ, दिंडोरी रस्त्यावरील नाशिक बाजार समिती परिसरात सकाळपासून शुकशुकाट होता. मालेगाव स्टॅन्ड परिसरात पंचवटी पोलिसांनी बॅरीकेटींगद्वारे वाहनधारकांना अडवून विचारपूस केल्यावरच सोडत होते. त्यामुळे याभागात शुकशुकाट होता. दिवसभर वर्दळ असलेल्या पंचवटी कारंजा परिसरातही शुकशुकाट होता. मात्र याही परिस्थितीत पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठांनी लसच्या दुसऱ्या डोससाठी मोठी गर्दी केली होती.

लस घेणाऱ्यांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यासाठी अनेक ज्येष्ठांनी मुले नातवंडे यांच्या साहाय्याने सकाळीच रुग्णालय गाठत नंबर लावला होता. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत दिंडोरी रोडवरील मनपाच्या मायको रुग्णालय, पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयात महापालिका व रेडक्रॉस सोसायटी यांच्यातर्फे सुरू असलेल्या स्वतंत्र लसीकरण मोहिमेद्वारे तब्बल साडेसातशेच्या आसपास नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लस उपलब्ध असेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Crowds flocked to Panchavati to get vaccinated even during the lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT