B D Bhalekar ground esakal
नाशिक

Nashik : पावसाच्या उसंतीनंतर देखावे बघण्यासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शनिवारी (ता. ३) सुटी व पावसाने सायंकाळी उसंत दिल्यानंतर नागरिकांनी गणेश दर्शन व उत्सवातील देखावे बघण्यासाठी भालेकर मैदानावर गर्दी झाली. दरम्यान, वीकेंड असल्याने गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र दुपारी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांच्या देखावे बघण्याच्या आनंदावर पाणी फिरल्याने देखावे बघण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर थोडा परिणाम झाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात बघावयास मिळाले. (Crowds to see ganeshotsav 2022 Decoration sights after rains Nashik Latest Marathi News)

दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. अनेक सार्वजनिक मंडळाकडून विविध प्रकारचे देखावे उभारले आहे. गणेशोत्सवाचा शनिवारी चौथा दिवस होता. अवघे सहा दिवस उत्सवास राहिले आहे. शिवाय आठवडा समाप्तीच्या शनिवार आणि रविवार सुटीच्या औचित्य साधत नागरिकांची देखावे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळेल, असे वाटत होते.

प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र बघण्यास मिळाले. दुपारी जोरदार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली होती. सायंकाळी काहीसे पावसाचे वातावरण दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या भीतीने देखावे बघण्यासाठी येण्यास पाठ केली. कोरोना प्रादुर्भावाचे दोन वर्ष सोडल्यास भालेकर मैदानावर अनेक मोठमोठ्या मंडळाचे भव्य देखावे बघण्यासाठी शहराच्या विविध भागातील नागरिक गर्दी करत असतात. इतके मोठे मैदानदेखील कमी पडत असते.

यंदादेखील मंडळांनीही विविध प्रकारच्या आकर्षक देखावे उभारले आहे. शनिवारी (ता. ३) भालेकर मैदानावर गर्दीचे चित्र बघावयास मिळाले. परंतु, शहराच्या इतर भागात काहीसे वेगळ्या प्रकारचे चित्र होते. गर्दी नसल्याने गणेशोत्सवानिमित्त पंचवटी दिंडोरी नाका येथे चिमुकल्यांसाठी लावलेल्या खेळणी व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT