CT Scan esakal
नाशिक

आजोळातील रुग्णसेवेसाठी धावले भाचे

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लहानपणापासून आजोळला ये-जा, गावाशी निर्माण झालेले भावनिक नाते, आजोबांच्या आजाराच्या काळात आरोग्य सुविधांसाठी झालेली धावपळ हा सर्व अनुभव लक्षात घेत अहमदनगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागप्रमुख डॉ. भूषण निकम यांनी मामेभाऊंच्या मदतीने आजोळमधील रुग्णांसाठी अल्पदरात सीटी स्कॅन (CT scan) सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. निकम यांनी सांगितले, की मी सध्या अहमदनगर येथे डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल येथे कॅन्सर विभागप्रमुख, कॅन्सरतज्ज्ञ म्हणून काम पाहतो आहे. माझे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले असून, एमबीबीएस व एमडी हे लोणी येथील प्रवरा मेडिकल कॉलेज येथे झाले. जसलोक व टाटा हॉस्पिटल येथेसुद्धा काम केले. डेन्मार्क देशातील रिग्ज हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग घेतले. मायभूमीकडे परतल्यानंतर आजोळला कळवण (जि. नाशिक) येथे मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात खूप जवळून आपले नातलग व जवळचे मित्र, प्रेमाची माणसं यांना कोरोनाने दुरावतांना बघितलं. यात काही बाबतीत वेळेवर तपासण्या न झाल्यामुळे, त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची परवड झालेली बघितली. कळवण हे तसं मोठं शहर व तालुका. माझ्या मामाचे गाव.

कोरोना (Corona) महामारीत कळवण, देवळा, सटाणा परिसरातील रुग्णांना तपासणीसाठी नाशिकला यावे लागत होते. साधा सीटी स्कॅनसाठी दोन-तीन दिवस वेटिंग, तिथे जेवण्याची अथवा राहण्याची सुविधासुद्धा होत नव्हती. आजोबा बाबूलाल केदा पगार (वय ८५) व आई निर्मला मनोहर निकम यांच्या आजारपणावेळी आम्हा कुटुंबीयांची झालेली धावपळीने आम्ही अधिक अस्वस्थ झालो. कळवणमध्ये मामेभाऊ छात्रसाळा माणिकराव पगार, अक्षय साहेबराव पगार व पंकज प्रभाकर पगार यांच्या मदतीने मल्टिस्किल्स हायटेक ‘सीई सीटी स्कॅन सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात कॉन्ट्रक्ट स्कॅन, एचआरसीटी, ब्रेन, छातीचा, पोटाचा, मेंदू, तसेच फुप्फुसांचा त्याचप्रमाणे पेरीफेरल ॲन्जिओग्राफी , मानेची Angiography, Plmonary Angiography या सुविधा असतील. यासाठी रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाणे यांची आम्हाला साथ लाभली असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT