टुडे पान ३, मेन फिचर
NSK26H34467
जळगाव : कार्यशाळेत ज्येष्ठ नागरीकांना मार्गदर्शन करताना सायबर तज्ज्ञ आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.
-------
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘मिशन सतर्क’
जिल्हा पोलिसांकडून जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे स्वरूपही दिवसेंदिवस बदलत आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, डिजिटल अरेस्ट, बनावट कॉल, सोशल मीडिया फसवणूक, ओटीपी व बँकिंग माहितीची चोरी, अशा विविध माध्यमांतून नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘सतर्क’ या महत्त्वाकांक्षी सायबर जनजागृती अभियानाचा पुढाकार घेतला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संकुले आणि विविध संस्थांमध्ये पोलिस अधिकारी व प्रशिक्षित पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन सायबर जनजागृती कार्यशाळा घेणार आहेत. केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, सायबर गुन्हे कसे घडतात, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाद्वारे नागरिकांना सक्षम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सेवानिवृत्तांना मार्गदर्शन
या अभियानाचा पहिलाच उपक्रम आज पोलिस अधीक्षक कार्यालयात, निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक हे सायबर गुन्हेगारांचे अनेकदा लक्ष्य ठरत असल्याने त्यांच्यामध्ये डिजिटल व्यवहारांबाबत आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा आणि www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
---------
फसवणुकीच्या २०२४ ते २०२६ पर्यंत दाखल गुन्ह्यांची माहिती
वर्ष......डिजिटल अरेस्ट.......शेअर्स ट्रेडिंग....टॅक्स फ्रॉड....सेक्सटॉर्शन......APK फाइल.......एकूण दाखल गुन्हे
२०२४-----०९----------- ३०----------०६---------०१--------------०१--------------७७
२०२५-----०६-----------१७----------०७-----------००--------------०१--------------४३
२०२६-----०४-----------०९----------०१-----------०१--------------०३--------------३५
एकूण-------१९---------५६-----------१४-------------०२---------०५--------------१५५
----------
ऑनलाइन एनसीसीआरपी पोर्टलवर दाखल तक्रारी
वर्ष........ऑनलाइन तक्रारी...........फसवणूक रक्कम.......गोठविलेली रक्कम
२०२४.........५२१..................१६ काेटी ३९लाख........११ काेटी १ लाख
२०२५........४,७२९................१० काेटी ३३ लाख........१६ काेटी ३० लाख
२०२६........४,७९३................७ काेटी १९ लाख.........१ काेटी ८९ लाख
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.