नाशिक

एका चुकीमुळे आयुष्यभराची कमाई आपण गमवू शकता - जितेंद्र बरडे

CD
टुडे पान ३ : ॲंकर NSK26H33985 जळगाव : ‘रोटरी’तर्फे आयोजित व्‍याख्‍यानात बोलताना जितेंद्र बरडे. ––– एका चुकीने गमवू शकता आयुष्यभराची कमाई (उपशीर्षक) जितेंद्र बरडे : ‘सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन बँकिंग’वर व्‍याख्‍यान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३० : सायबर म्हणजे इंटरनेट, या संपर्काच्या माध्यमाशिवाय आज कोणी राहू शकत नाही. मात्र याचा वापर करताना सतर्कता आणि जागरूकता बाळगणे गरजेचे आहे. मोबाईल वापरताना आपण केलेल्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगारांना संधी मिळते आणि आपण आपली आयुष्यभराची कमाई गमवू शकतो, असे ट्रेड अँड फोरेक्स डिपार्टमेंटचे सीनियर मॅनेजर जितेंद्र बरडे (पुणे) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहावे? या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष ॲड. केतन ढाके, मानद सचिव दीपक नाथानी यांची प्रमुख उपस्थिती होती. बरडे यांनी सांगितले, की विविध ई-मेल्स, एसएमएस, लॉटरी, टूर्स ऑफर्स, रिफंड, ट्रॅफिक दंड ई- चलन, रिफंड, डिस्काउंट योजना, जॉब अशा विविध बनावट प्रकाराबरोबर सायबर गुन्हेगार आज नवीन नवीन फंडे वापर करीत डिजिटल अरेस्टपर्यंत पोहोचले आहे. नागरिक मात्र आजही ईझी मनीच्या नादात किंवा जाहिरातींच्या मोहजलात सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहे. कोणत्याही अनोळखी कॉल, मेसेज, ई-मेल, जाहिराती या विषयीच्या लिंक क्लिक करू नये. केल्यास छुप्या पद्धतीने विविध ॲप डाऊनलोड होतात आणि गुन्हेगार आपल्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतात असे बरडे यांनी सांगितले. तसेच महिला ऑनलाइन शॉपिंगचा जास्त वापर करतात. त्या सायबर गुन्हेगारांच्या सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यांनी विशेष काळजी घ्यावी. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती. –

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

CBSE Class 10 Syllabus Change: 'सीबीएसई'च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल! दहावीच्या अभ्यासक्रमातून 'पर्यावरण शिक्षण' विषय वगळला, व्यावसायिक शिक्षण अनिवार्य

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

ChatGPTचा सल्ला ठरला जीवघेणा! ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू; एआयवर विश्वास ठेवणे ठरतेय धोकादायक

SCROLL FOR NEXT