नाशिक

सावधान! सायबर भामट्यांनी केली ६० लाखांची लूट

CD
सायबर भामट्यांकडून ६० लाखांची लूट वेगवेगळ्या तीन क्लृप्त्या वापरून नागरिकांवर जाळे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या तीन क्लृप्त्या वापरून नाशिकमधील नागरिकांवर जाळे फेकले आणि तब्बल ५९ लाख ७३ हजार रुपयांचा डिजिटल लूट केली. यामध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एकाला ४३ लाखांचा गंडा, तर तरुण विद्यार्थ्यांना शेअर मार्केटच्या जाळ्यात ओढून १५ लाखांची फसवणूक केली. एवढेच नव्हे, तर गॅस बिलाचा बहाणा करून निवृत्त वृद्धाच्या खात्यावरही १ लाख ७३ हजारांवर डल्ला मारला आहे. ​‘तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे’, अशा खोट्या धमक्या देऊन सायबर भामट्यांनी एकाचे आयुष्य टांगणीला लावले. नेहा शर्मा, अजय गुप्ता आणि विजय खन्ना अशी नाव सांगणाऱ्या भामट्यांनी बनावट डेबिट कार्डचे फोटो पाठवून पोलिस चौकशीचा बनाव रचत खात्याची पडताळणी करण्याच्या बहाण्याने बंधन बँकेच्या खात्यावर तब्बल ४३ लाख रुपये भरायला लावून ही रक्कम लांबवली. दुसऱ्या घटनेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाच्या भवितव्यावरच दरोडा टाकला. ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ५० हजारांचा परतावा आणि अवघ्या २० महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आकर्षक आमिष दाखवले. गोविंदनगर येथील बिझनेस कोर्टात कार्यालय थाटलेल्या सौरभ सुनील पगार या संशयिताने मालेगावच्या संदीप पाटील या तरुणाला जाळ्यात ओढले. रोख व आरटीजीएसद्वारे १५ लाख रुपये उकळल्यानंतर मुद्दल न परत करता पोबारा केला. मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत ​कमोदनगर येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय निवृत्त नागरिक गिरीष कृष्णाजी जोशी यांना व्हॉट्सॲपवर ‘गॅस बिल पेंडिंग’ असल्याचा मेसेज आला. ‘बिल न भरल्यास गॅस कनेक्शन कापले जाईल’ अशी भीती दाखवत अज्ञाताने एपीके फाईल पाठवली. जोशी यांचा विश्वास संपादन करून मोबाईलचा ताबा मिळवत भामट्याने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून १ लाख ७३ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ​--- नागरिकांनो, हे लक्षात ठेवा - कोणतीही तपास यंत्रणा सीबीआय, इडी, सायबर पोलिस फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर कोणालाही ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. असा फोन आल्यास अजिबात घाबरू नका. -​अनोळखी एपीके फाईल डाऊनलोड करू नका. व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेली कोणतीही फाईल किंवा ॲप इन्स्टॉल केल्यास तुमचा मोबाईल भामट्यांच्या ताब्यात जाऊ शकतो. -दुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका. रातोरात श्रीमंत करणाऱ्या शेअर मार्केटच्या किंवा गुंतवणुकीच्या कोणत्याही योजनेवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. - सायबर हेल्पलाइन : अशी फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT