Dada Bhuse news esakal
नाशिक

Dada Bhuse | मुंबई महामार्गाची 8 दिवसांत दुरुस्ती करा : पालकमंत्री दादा भुसेंचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. ३१) दिले.

शासकीय विश्रामगृहात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील यांच्यासमावेत श्री. भुसे यांची बैठक झाली. (Dada Bhuse Repair Mumbai highway in 8 days Guardian Minister Dada Bhuse instructions to officers nashik news)

पालकमंत्री भुसे म्हणाले, की मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे तातडीने भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा. जनभावना तीव्र असून, टोल बंदची मागणी नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची राहील.

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपूल यांचाही प्रस्ताव तातडीने करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना या वेळी देण्यात आल्या. नाशिक शहरातून जाणाऱ्या महामार्गाचीही डागडुजी व दुरुस्ती तातडीने करण्यासंदर्भात सूचना या वेळी देण्यात आल्या.

नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात डागडुजी व दुरुस्तीची कामे पूर्ण होणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या. आठ दिवसांत डागडुजी व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास येतील याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT