नाशिक

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे कार्य क्रांतिकारी

CD
११ वा लेख चित्रमहर्षी फाळके यांचे कार्य क्रांतिकारी --------------------------------- भारतीय चित्रपटसृष्टीची गंगोत्री : नाशिक --------------------------------- नाशिककडे केवळ एक धार्मिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक शहर म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. हे शहर भारतीय चित्रपटसृष्टीच्या उगमकाळाशी थेट जोडलेले आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे नाशिकला चित्रपट इतिहासात अनन्यसाधारण स्थान मिळाले आहे. ऐतिहासिक वारशापासून ते आधुनिक चित्रीकरणाच्या आवडीच्या ठिकाणापर्यंतचा नाशिकचा सिनेप्रवास अत्यंत गौरवशाली आहे. - शाम लोंढे, नाशिक दादासाहेब फाळके आणि चित्रपटसृष्टीची पायाभरणी.... नाशिक ही दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यांच्या कल्पकतेतून आणि अथक परिश्रमांतून नाशिकला आशिया खंडातील सुरुवातीच्या चित्रपट निर्मिती केंद्रांपैकी एक म्हणून ओळख मिळाली. ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला पूर्ण लांबीचा मूकपट याच भूमीत साकारला गेला. भद्रकाली परिसरातील फाळके रोडवर त्यांनी स्टुडिओ उभारला होता. तिथे भव्य राजवाडे, कारंजे आणि विविध सुंदर दृश्यरचना तयार करण्यात आल्या होत्या. दादासाहेब केवळ उत्कृष्ट चित्रकार नव्हते, तर त्यांना वास्तुरचना आणि दृश्यरचनेचाही उत्तम अभ्यास होता. बाह्य चित्रीकरण, प्रकाशयोजना आणि कॅमेऱ्याचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. त्र्यंबकेश्वर परिसर, गोदावरीचे घाट, निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा यांसारख्या ठिकाणांचा त्यांनी चित्रपटांसाठी प्रभावी उपयोग केला. जादूचे प्रयोग आणि ‘विशेष दृश्यपरिणाम’ दादासाहेबांना जादूचे प्रयोग करण्याची आवड होती आणि ते ‘केळफा’ या नावानेही ओळखले जात. याच अनुभवाचा उपयोग त्यांनी चित्रपटांतील दृश्यात्मक चमत्कार साधण्यासाठी केला. ‘राजा हरिश्चंद्र’ किंवा ‘कालियामर्दन’ सारख्या चित्रपटांमधील देवांचे प्रकट होणे यांसारख्या दृश्यांनी तत्कालीन प्रेक्षकांना थक्क केले. आजच्या काळातील ‘स्पेशल इफेक्ट्स’चे प्राथमिक स्वरूप त्या काळातील चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्याकडून चित्रपट निर्मितीचे तंत्र शिकण्यासाठी अनेक कलाकार आणि चित्रपटप्रेमी नाशिकमध्ये येत असत. पुढे कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर यांच्यासारख्या दिग्गजांनी या चित्रपट चळवळीला पुढे नेले. नाशिकच्या निसर्गात खुलले हिंदी चित्रपटांचे विश्व काळ बदलला, बोलपटांचा जमाना आला आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर ही चित्रपट निर्मितीची प्रमुख केंद्रे बनली. मात्र, नाशिकच्या निसर्गसौंदर्याचे आकर्षण कायम राहिले. मुंबईपासून जवळ असलेला हा परिसर चित्रीकरणासाठी अत्यंत सोयीचा ठरला.१९५८ मध्ये आलेल्या ‘मधुमती’ चित्रपटातील ‘सुहाना सफर और ये मौसम हसीं’ हे प्रसिद्ध गाणे इगतपुरी आणि भंडारदरा परिसरात चित्रित झाले. ऑस्करसाठी नामांकित ठरलेला ‘मदर इंडिया’, तसेच ‘गंगा जमुना’, ‘द ट्रेन’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘दुश्मन’ यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांचे चित्रीकरण नाशिकच्या ग्रामीण व निसर्गरम्य भागात झाले. गंगापूर गाव, मंदिरे आणि इगतपुरीचा परिसर चित्रपटांमुळे देशभरात पोहोचला. कालांतराने मुंबई, पुणे आणि कोल्हापूर ही चित्रपट निर्मितीची प्रमुख केंद्रे म्हणून विकसित झाली. व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी पुण्यात चित्रपट निर्मिती संस्थांची उभारणी केली. मात्र, चित्रपटांच्या बाह्य चित्रीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणांना निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सातत्याने पसंती मिळत राहिली. आधुनिक चित्रपटसृष्टीतही नाशिकची मोहिनी तंत्रज्ञान बदलले तरी नाशिकचे महत्त्व कमी झाले नाही. ‘खाकी’ चित्रपटाचे चित्रीकरण त्र्यंबकेश्वर व इगतपुरी परिसरात झाले. आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटात काळाराम मंदिर परिसर आणि गोदावरी घाटाचे दर्शन घडले. ‘बुलेट राजा’, ‘डेढ इश्किया’ आणि अलीकडच्या काळातील ‘लापता लेडीज’ यांसारख्या चित्रपटांत येवला, तळेगाव व ग्रामीण वातावरणाला पसंती मिळाली. याशिवाय अनेक मालिका, वेब सिरीज आणि लघुपटांचे चित्रीकरण सतत नाशिकमध्ये सुरू असते. नाशिकच्या भूमीवर उमटलेले विविध चित्रपटांचे ठसे नाशिकशी विशेष नाते जपणारे दिग्दर्शक एन. चंद्रा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘प्रतिघात’ या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुजाता मेहता, चरणराज आणि रोहिणी हट्टंगडी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. त्यानंतर १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’ या चित्रपटाचे चित्रीकरणही नाशिकच्या जुन्या शहरातील चव्हाटा परिसर, पंचवटी आणि अमरधाम परिसरात करण्यात आले. या चित्रपटात सनी देओल, डिंपल कपाडिया आणि ओम पुरी यांसारखे कलाकार होते. ‘करिश्मा कुदरत का’ या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक आणि दिंडोरी परिसरात करण्यात आले. या चित्रपटातील एका गाण्यासाठी चिंचबारी येथे मोठा सेट उभारण्यात आला होता. धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिता राज आणि रती अग्निहोत्री यांसारख्या कलाकारांमुळे या चित्रपटाला विशेष ओळख मिळाली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बत’ या चित्रपटाचे चित्रीकरण गंगापूर गाव आणि सोमेश्वर धबधबा परिसरात करण्यात आले. या चित्रपटात अनिल कपूर, विजेता पंडित, अमजद खान आणि अमरिश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी नाशिकच्या भूमीत रोवलेले चित्रपट कलेचे बीज आज वटवृक्ष बनले आहे. आजही नाशिक जिल्ह्यात चित्रीकरणासाठी अनुकूल निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आणि घाट उपलब्ध आहेत. या वारशाचे जतन करून आधुनिक सुविधा उपलब्ध केल्यास नाशिक पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीचे आणि सांस्कृतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनू शकेल. नाशिक हे केवळ जुन्या इतिहासाचे स्मारक नसून, भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्याची एक अत्यंत आशादायी भूमी आहे. (लेखक कला दिग्दर्शक व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय प्रमुख आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT