नाशिक

दंडे गोल्ड अँड डायमंड्सची गोविंदनगरमध्ये शाखा सुरू

CD
फोटो -NSK26H34200 नाशिक : दंडे गोल्ड अँड डायमंड्सच्या गोविंदनगरमधील शाखेच्या शुभारंभप्रसंगी संचालक अनिल दंडे, योगेश्‍वर दंडे व परिवार. दंडे गोल्ड अँड डायमंड्सची गोविंदनगरमध्ये शाखा सुरू ------------------------ आज घडणावळीवर सवलत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : ग्राहकांचा विश्वास, दागिन्यांचा दर्जा आणि कलात्मकतेची परंपरा जपत दंडे गोल्ड अँड डायमंड्सने नाशिकच्या गोविंदनगर येथे आपल्या चौथ्या आणि आजवरच्या सर्वांत मोठ्या शाखेचा शुभारंभ केला. या शाखेत ग्राहकांना स्वतःच्या पसंतीनुसार अंगठी तयार करून घेण्याची ‘रिंग स्टुडिओ’ ही अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९२७ मध्ये अमरावती येथे सुरू झालेल्या या सुवर्णपेढीने नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर येथे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यानंतर नाशिक शहरात गोविंदनगरमधील नव्या शाखेच्या माध्यमातून संस्थेने आपल्या विस्ताराचे आणखी एक पाऊल टाकले आहे. पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक डिझाइन्स, सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील पारदर्शकता हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. नव्या शाखेत सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल. रिंग स्टुडिओमध्ये ग्राहकांना धातू, हिऱ्याचा आकार आणि डिझाईन निवडून मनपसंत अंगठी बनविता येणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा संस्थेने केला आहे. शुभारंभानिमित्त ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरदरम्यान सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. लग्नसराई, सण-समारंभ आणि खास कौटुंबिक प्रसंगांसाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. आकर्षक डिझाईन्स आणि घडणावळीवरील भरघोस सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांनी या नव्या शाखेला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे संचालक अनिल दंडे, योगेश्‍वर दंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: आऊट की सिक्स? इशान किशनचा शॉट अन् ऍलेनची भन्नाट फिल्डिंग, पण थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद

Latest Marathi News Update : नांदेडमध्ये १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दाखवा, वर्षभर शर्ट घालणार नाही; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना तरुणाचे थेट आव्हान

Crime: रक्षकच बनले भक्षक! १६ वर्षीय मुलीवर पोलीस ठाण्यातच PIकडून अनेकदा अत्याचार; गुन्हा दाखल

पंजाबमध्ये निवडणुकीआधी 'आप'ला धक्का, २ आमदारांनी दिला राजीनामा; कारण आलं समोर

कोण आहेत वृंदावनातील Gen Z बाबा? १९व्या वर्षी बनले भागवत कथावाचक, सोशल मीडियावर होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT