नाशिक

रोटरी तर्फे दांडीयाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी

CD
ॲंकर जिल्हा टुडे पान एकसाठी BSW26B12196 मुंबई : दांडिया उपक्रमातून जमलेल्या तीन लाखांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना भुसावळच्या रोटरी रेल सिटी क्लबचे अध्यक्ष सुयश न्याती, सचिव डॉ. राहुल पांडे, सदस्य तथा वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, तेजस नवगाळे, विशाल शाह आदी. ----------------- दांडियातून जमलेला निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला ---- भुसावळ रोटरी रेलसिटीचा उपक्रम; तीन लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ३ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे आयोजित दांडिया कार्यक्रमातून जमा झालेली तीन लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. दरवर्षी नवरात्रोत्सवात रोटरी रेल सिटीतर्फे दांडिया आयोजित करण्यात येतो. यंदा आनंदासोबतच प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन दांडियाचे आयोजन करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचविण्यासाठी प्रबोधन करणारे पोस्टर मैदानात लावले होते. शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आयोजनातून मिळालेल्या तीन लाख रुपयांच्या निधीचा धनादेश मुंबईतील मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी रोटरी रेल सिटीचे सदस्य तथा राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, रेलसिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, सचिव डॉ. राहुल पांडे, दांडिया प्रकल्प प्रमुख तेजेश नवगाळे व विशाल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते. उत्सवातून सामाजिक दायित्व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, या उत्सवातून जमा झालेला निधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरजूंसाठी वापरण्याचा स्तुत्य निर्णय क्लबच्या कार्यकारिणीने घेतला. सणोत्सवाच्या आनंदासह दुष्काळाशी सामना करणाऱ्या बळीराजाच्या व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे अध्यक्ष सुयश न्याती यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून कौतुक मंत्रालयात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोटरी रेलसिटीच्या या संवेदनशील व सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. संकटाच्या काळात अशाप्रकारे सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात देणे, हे कौतुकास्पद आहे. रोटरी क्लबचे हे योगदान दुष्काळग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत क्लबच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT