delta variant esakal
नाशिक

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; डेल्टामुळे अर्लट

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे (delta variant) रुग्ण आढळल्याने ज्या भागात रुग्ण आढळून आले, त्या भागातील कॉन्टक्ट ट्रेसिंग तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची अ‍ॅन्टीजेन तसेच थर्मल स्क्रिनिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाशिकला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (corona second wave) संसर्ग कमी होत असल्याने निर्बंधातून सूट दिली असताना जिल्ह्यात डेल्टाचे ३० रुग्ण आढळल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका (corona third wave) व्यक्त केला जात आहे. मात्र जिल्ह्यात आढळलेले हे रुग्ण जून- जुलै महिन्यातील असून, हे रुग्ण कोरोनामुक्त झाले असून या रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. त्यांनी नजीकच्या काळात कोणत्या जिल्ह्यात प्रवास केला. कुणाशी संपर्क आला याची माहिती संकलित केली जात आहे. परंतु यात घाबरण्याचे कारण नसले तरी, खबरदारी म्हणून कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे.

डेल्टाचा वाढत्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासन अर्लट

नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या नगर, पुणे, मुंबई या भागात अजूनही रूग्णसंख्या वाढत असल्याने येथून येणाऱ्या प्रवाशांच्या अ‍ॅन्टीजेन तपासणीचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते म्हणून, सरसकट तपासणी न करता निवडक प्रवाशांची तपासणी करून बाहेरून येणाऱ्या ‍प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी, मास्क लावणे, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



जिल्हा कोरोना रुग्ण संसर्ग दर
नगर ५३८६ ५.३ टक्के
पुणे ६४९१ ५.८ टक्के



डेल्टाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यामुळे निर्बंधातही कोणते बदल करण्यात येणार नाही. ज्या भागात रुग्ण आढळून आले आहे त्या भागात आरोग्य विभागामार्फत विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी


बाहेरच्या जिल्ह्याहून हा व्हेरिएंट असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने आम्ही बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येणाऱ्या प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग करणे, अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT