नाशिक

प्रा. साळुंखे यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन

CD
NSK26H32266 जळगाव : प्रा. दशरथ साळुंखे लिखित दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस. सोबत अन्य मान्यवर व सदस्य. ------- प्रा. साळुंखे यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील निवृत्त अधिकारी प्रा. डॉ. दशरथ साळुंखे लिखित ‘गाव शिवारातल्या कविता व ‘शब्दधन वाटू जनलोका’ काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. काव्यसंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे(डाएट)चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अहिराणी साहित्यिक प्राचार्य डॉ. बापूराव देसाई, प्रा. डॉ. साहेबराव भूकन, अथर्व प्रकाशनचे प्रमुख युवराज माळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगीता महाजन व महेंद्र साळुंखे यांनी केले. सौरभ साळुंखे यांनी आभार मानले. ‘गाव-शिवारातल्या कविता’ या काव्यसंग्रहातून प्रा. साळुंखे यांनी ८० व ९०च्या दशकातील लोकजीवन, गावगाडा, तत्कालीन गाव-शिवारातील शेती, माती, पीकपाणी, गरिबी, शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन, ग्रामीण सणोत्सव, जत्रा, पाऊस पाणी, धरण, ज्येष्ठ नागरिक व देव-देवता यांचे प्रभावी चित्र रंगवले आहे. तर ‘शब्दधन वाटू जनलोका’ हा काव्यसंग्रह त्यांनी महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक, क्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ, देवदेवता, प्रसिद्ध गायक, अभिनेते, आजूबाजूच्या समाजातील काही नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या कर्तृववान व्यक्ती यांना समर्पित केला आहे.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT