Datta Jayanti 2023 Shri Gurucharitra Vachan Parayana collectively at Dindori Pranit Shri Swami Samarth Seva Kendra nashik news esakal
नाशिक

Datta Jayanti 2023: दत्तजयंती निमित्त श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचा पारायण सोहळा; वाचनासाठी शेकडो सेवेकरी उपस्थित

सप्ताहात सामूहिकपणे श्री गुरूचरित्र वाचन पारायण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र , बाल संस्कार केंद्र सिन्नर यांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड जप नाम यज्ञ सप्ताह दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे.

या सप्ताहात सामूहिकपणे श्री गुरूचरित्र वाचन पारायण होत आहे. (Datta Jayanti 2023 Shri Gurucharitra Vachan Parayana collectively at Dindori Pranit Shri Swami Samarth Seva Kendra nashik news)

सिन्नर केंद्रात शहरातील स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन, सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा, स्वामी चरित्र पाठ, नित्य स्वाहाकार, गणेश याग, श्री दत्त (स्वामी) याग, रुद्र याग, चंडी याग अशा विधिवत सेवा पार पडत आहेत.

या सप्ताह काळात वेदतुल्य परम प्रासादिक श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आणि यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा सप्ताह काळात होत असून सर्व सेवेकरी भाविक दिवस-रात्र अखंड नामस्मरण करून उपासना करत आहेत.

यावर्षी वेदतुल्य परम प्रासादिक श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण वाचण्यासाठी सुमारे सहाशे महिला व पुरुष असे बसलेले असून यामध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ पर्यंत अनेकांनी पहारा घेण्यासाठी नामस्मरण करीत आहे.

यावेळी स्वामी चरित्र वाचन वीणा वादन माळ जप या गोष्टी पहारासाठी दिवस रात्र अनेक पुरुष व महिला करीत असून श्री स्वामी समर्थ सिन्नर येथील केंद्रात अनेक सेवेकरी दत्त जयंती निमित्त परिश्रम घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT