नाशिक

अंबडचा पाणी पुरवठा सुरळीत

CD
टूडे साठी महत्वाचे --------------------------- दत्तनगरला नव्या जलवाहिनीतून पुरवठा परिसर टँकरमुक्त; बोअरवेल सील; नागरिकांना दिलासा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आलेल्या अंबडच्या दत्तनगरमध्ये तातडीची उपाययोजना म्हणून महापालिकेने सुरु केलेले पाच टँकर पूर्णपणे बंद करण्यात आले असून, अमृत योजनेतून टाकलेल्या नवीन १८०० मीटर जलवाहिनीतून पुरवठा सुरु करण्यात आल्याने आरोग्याशी सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दत्तनगर भागातील नागरिकांना अर्धा इंची नळ कनेक्शन असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची गरज भागविण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली. परंतु बोअरवेलमधून पिवळे पाणी येवू लागले. ते पाणी रसायनयुक्त असल्याने नागरिकांना त्वचेचे विकार जडले. राज्यभर अंबडच्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा गाजला. आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा महापालिका प्रशासनावर रोष असताना त्यात पिवळ्या व रसायनयुक्त पाण्याची भर पडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून बोअरवेलचे पाणी बंद करून या भागात पाच टँकरद्वारे वीस फेऱ्यांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. नव्याने टाकण्यात आलेल्या अठराशे मीटर पाइपलाइनमधून महापालिकेने पाणीपुरवठा सुरु कताना त्याच पाइपलाइनवरून १३० घरे तसेच सोसायट्यांना नळजोडण्या दिल्या. २७ ऑक्टोबरपासून त्याद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. --------कोट---------- पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर येथे तातडीने नवीन जलवाहिनी टाकून १३० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून, टँकर बंद करून नागरिकांना शुद्ध पिण्यायोग्य पाणी दिले जात आहे. - रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT